कल्याण : कल्याण पूर्व भागात खासगी कोविड रुग्णालयासाठी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी जागा उपलब्ध करुन दिल्याने श्रीदत्त मल्टीस्पेशालिटी खासगी कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.
कल्याण पूर्व भागातील पुना लिंक रोडवर हे रुग्णालय सुरु झाल्याने रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जागा उपलब्ध करुन दिल्यावर हे रुग्णालय अवघ्या दहा दिवसात उभे करण्यात आले आहे. त्याठिकाणी ऑक्सिजन आणि आयसीयू असे एकूण २२ बेड आहेत. कल्याण पूर्व भागात महापालिकेचे कोविड रुग्णालय तयार आहे. मात्र ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने हे रुग्णालय सुरु करता आलेले नाही. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. नगरसेवक गायकवाड यांच्या प्रयत्नांनी २२ बेडचे खासगी रुग्णालयात उपलब्ध झाले आहे.
.........
शाळेलाही मदतीचा हात
कल्याण पूर्व भागातील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन ज्ञानमंदिर शाळेला एकूण ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यापैकी २५ हजार रुपयांची मदत नगरसेवक गायकवाड यांनी तर समाजसेविका वैशाली ठाकूर यांनी १५ हजार रुपये दिले आहेत. कोरोनामुळे शाळांना अन्य खर्च भागविणे जड जात आहे. ही बाब लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली आहे.
--------------
वाचली