विद्यार्थ्यांना नेऊन जाणारी खासगी बस दुर्गाडी पुलावर उलटली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 10:34 PM2019-12-15T22:34:49+5:302019-12-15T22:41:54+5:30

अज्ञात वाहनाने बसला कट मारल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.

The private bus carrying the students overturned on the Durgadi bridge | विद्यार्थ्यांना नेऊन जाणारी खासगी बस दुर्गाडी पुलावर उलटली

विद्यार्थ्यांना नेऊन जाणारी खासगी बस दुर्गाडी पुलावर उलटली

googlenewsNext

कल्याण : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटल्याची घटना रविवारी रात्री 9 च्या सुमारास दुर्गाडी पुलावर घडली. एका अज्ञात वाहनाने बसला कट मारल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.

 वज्रेश्वरीला सहलीसाठी गेलेल्या अंबरनाथमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ही बस असल्याचे समजते. या बसमध्ये सुमारे 25 विद्यार्थी होते. त्यापैकी 2 जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघात घडताच पोलीस आणि स्थानिकांनी आतल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, या अपघातामुळे कोनकडून कल्याणकडे येणाऱ्या मार्गावर आणि दुर्गाडी चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करून रस्ता मोकळा केला.

Web Title: The private bus carrying the students overturned on the Durgadi bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.