शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, मुख्यमंत्री, पवार ठाण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 05:39 IST

मेट्रो ५ चे भूमिपूजन; पुढील आठवड्यात विविध कार्यक्रम

- सुरेश लोखंडेठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाणे - कल्याण - भिवंडी मेंट्रो- ५ च्या भूमिपूजनासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर १८ डिसेंबर रोजी येत आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार २२ डिसेंबरला शहापूर येथे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील भिवंडीला ३१ डिसेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत.मुंबई मेट्रो ४च्या नंतर आता ठाणे-कल्याण आणि भिवंडी या मेट्रो ५च्या भूमिपूजनाचा मुहूर्त एमएमआरडीएद्वारे निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या हस्ते मंगळवारी होणाºया या कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे ठिकाण निश्चित करण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सोइस्कर ठरणारे कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असून, जिल्हा प्रशासनही प्रयत्न करीत आहे.ठाणे-कल्याण- भिवंडी हा मेट्रो प्रकल्प सुमारे २५ ते ३० किलोमीटरचा आहे. एमएमआरडीएद्वारे होत असलेल्या या मेट्रोचे कल्याण एपीएमसी मार्केट येथील नंबर एकचे स्टेशन असून, त्यानंतर कल्याण मेट्रो स्टेशन, सहाजानंद चौक, दुर्गाडी फोर्ट, आधारवाडी, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, कोलशेत आणि कशेळी, बाळकूम नाका आणि कापूरबावडी आदी आदी मुख्य १७ स्टेशन आहेत. या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते निश्चित झाले. त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधितांमध्ये त्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.लग्नाचा मुहूर्त दोन वर्षे लांबणीवरराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शहापूर येथे एका लग्न समारंभासाठी येत आहेत. २२ डिसेंबर रोजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे चिरंजीव निखील बरोरा यांचा लग्न समारंभ आहे. निखील हे ठाणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आहे. त्यांच्या लग्नाचा मुहूर्त पवार यांनी तारीख दिल्यानंतरच काढण्यात आला. त्यासाठी सुमारे दोन वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. त्यानंतर, पवार यांच्या मिळालेल्या तारखेस अनुसरून या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. याशिवाय खासदार कपील पाटील यांच्या चिरंजीवांच्या लग्नास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३१ डिसेंबरला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस