शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सावधानतेचा इशारा; ठाणे-पालघरच्या ३५ बोटी अद्याप समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:21 IST

ठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत.

सुरेश लोखंडेठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत. उशिरापर्यंत या मोठी पोहण्याची शक्यताा वर्तवण्यात आली आहे. या बोटी किना-यास लागेपर्यंत सर्वांचे लक्ष त्याकडे लागून आहे.सुमारे ४८ तासाच्या कालावधीत ओक्खी चक्रीवादळ गुजराथ व मुंबईच्या समुद्रात धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे - पालघर जिल्ह्यातील शेकडो मच्छीमा-यांच्या सुमारे एक हजार ३८४ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. यापैकी एक हजार ३४९ बोटी ठिकठिकाणच्या किना-यावर सुखरूप लागल्याचा दावा येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तालयाकडून केला जात आहे. उर्वरित पालघर जिल्हह्याच्या ३४ मच्छीमार बोटींसह ठाणे जिल्ह्यातील एक बोट अद्याप समुद्रात आडकलेली आहे. परंतु या सर्व बोटी सुख्यरूप असून त्यावेळीच किना-यावर लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.ओखी या जीव घेण्या चक्रीवादळापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होऊन नये म्हणून हवामान खात्याच्या सुचनेनुसार किनारपट्टी लगतच्या गावांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिकां, पोलिस आयुक्तालय, पोलिस अधिक्षक, तहसिलदारांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणाना देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छीमा-यांसह सर्वांना कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तर समुद्रातील बोटींना जवळच्या किना-यावर लागण्याचा संदेश देऊन खातर जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातून ६९० मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यातील ६८९ बोटी परत येऊन किना-यास लागल्या आहेत. उर्वरित गस्पेल गौ-या यांची ‘ दंवदास’ ही बोट देखील लवकरच उत्तन बंदरात लागणार आहे. त्यातील खलासी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. झाई, वरोर, आगर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू,घिवली, उच्छेळी, नवापूर, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, वडराई, टेभी, दादरपाडा, केळवे, माहीम, केळवा, एडवण, कोरे, दातिवरे, किल्लाबंदर (अर्नाळा), पाचूबंदर, नायगाव आणि खोचिवडे आदी पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून ६९४ मच्छीमार बोटी समुदा्रत गेल्या असता त्यापैकी ६६० बोटी किना-यास सुख्यरूपपणे लागल्या आहेत.समुद्रात पालघरच्या आडकलेल्या ३४ बोटी किनाºयावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डहाणू बंदारातील भाग्यसाई, मातोश्रीप्रसाद, व गणेश धानमेहेर यांची भाग्यसाई या तीन बोटी समुद्रात आहेत. याशिवाय धाकटी डहाणूची धनवृद्धी, एडवन बंदरातील जयदत्तसाई ही बोटी परत आली नाही. तर सातपाटी बंदारातील १८६ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. त्यातील १५७ बोटी परत आल्या आहेत. तर २९ बोटी समुद्रात आहेत. त्या लवकरच किना-यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणांसह मच्छीमार विकास सहकारी संस्था सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ