प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:29 PM2020-12-17T23:29:57+5:302020-12-17T23:30:17+5:30

सांत्वनासाठी आलेले दरेकर परत, समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा

Praveen Darekar reached Wadya, but Savra family in Nashik | प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

Next

वाडा : भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गुरुवारी दुपारच्या सुमारास दिवंगत विष्णू सवरा यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते. परंतु सवरा कुटुंबीय दशक्रिया विधीसाठी नाशिकला गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नसल्याने दरेकर यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी सवरांच्या दु:खी कुटुंबीयांची भेट घेतली. ते तीन दिवस आधी पालघर जिल्हा अध्यक्षांना पूर्वकल्पना देऊन आले होते. त्यामुळे त्यांची सवरा कुटुंबाशी भेट झाली. तसेच जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते. परंतु दरेकर यांचा त्यांच्या नेत्यांशी समन्वयाचा अभाव असल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ते चंद्रकांत पाटील यांच्या समवेत येऊ शकले असते किंवा येण्यापूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधायला हवा होता. परंतु तसे झाले नाही आणि म्हणूनच दरेकर यांना वाड्यात येऊनही सवरा कुटुंबीयांना न भेटताच परत जावे लागले.

ग्रामीण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सवरा यांचे मोठे योगदान - पाटील
वाडा : भारतीय जनता पक्षाचा विचार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहोचवून आपल्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचे कार्य विष्णू सवरा यांनी खऱ्या अर्थाने केले असून पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांची उणीव आम्हाला सतत भासत राहील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी वाडा येथे सवरा कुटुंबीयांच्या आयोजित सांत्वन बैठकीत म्हणाले. 
सवरा यांची संघाशी अशी नाळ जोडली होती की, त्याशिवाय अन्य कुठला विचारही करू शकत नव्हते. सवरा यांना इतरांशी संघर्ष करताना मी पाहिले आहे, अशा शब्दांत पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला.
त्यांचा मुलगा डाॅ. हेमंत सवरा आणि कुटुंबीयांचे पाटील यांनी सांत्वन केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ठाणे ग्रामीणचे प्रभारी व जेष्ठ नेते बाबाजी काठोळे, माजी आमदार पास्कल धणारे, जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, सुजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Praveen Darekar reached Wadya, but Savra family in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.