शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत एकाकी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे प्रल्हाद म्हात्रेंनी घेतले पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:07 IST

डोंबिवली पश्चिमेतील विश्वनाथ भिकाजी सहस्रबुद्धे वयाच्या ८५व्या वर्षी एका खोलीच्या घरात एकटेच खितपत पडलेले असतांना त्यांना कल्याण डोंबिवली परिवहन समितीचे मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आधार दिला. त्यांच्या वार्धक्याची जबाबदारी उचलत त्यांचे पालकत्व स्विकारले असून त्यांना नुकतेच गरिबाचा वाडा परिसरातील वृद्धाश्रमात ठेवण्यात आले.

ठळक मुद्दे मनसेने जपली सामाजिक बांधिलकी विश्वनाथ सहस्त्रबुद्धेंच्या वार्धक्याची घेतली जबाबदारी

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील विश्वनाथ भिकाजी सहस्रबुद्धे वयाच्या ८५व्या वर्षी एका खोलीच्या घरात एकटेच खितपत पडलेले असतांना त्यांना कल्याण डोंबिवली परिवहन समितीचे मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आधार दिला. त्यांच्या वार्धक्याची जबाबदारी उचलत त्यांचे पालकत्व स्विकारले असून त्यांना नुकतेच गरिबाचा वाडा परिसरातील वृद्धाश्रमात ठेवण्यात आले.जीवन एक संघर्ष आहे. आणि हे असं संघर्ष असलं तरी संघषार्शी दोन हात करायला माणसाला कठीण काळात जिवाभावाची माणसं, वय आणि शरीराचीसुद्धा साथ हवी असते. यांशिवाय माणूस संघर्ष करू शकत नाही. तो हतबल होतो, मनाने कच खातो आणि शेवटी ज्या गोष्ठीचा स्वप्नातही विचार केला नाही, अशा अनाकलनीय गोष्टींसमोर तो शरणागती पत्करतो, नेमके तसेच काहीसे सहस्त्रबुद्धेंच्या बाबतीत घडल्याचे म्हात्रे म्हणाले. सहस्रबुद्धे ६५ वर्षांपासून डोंबिवलीत वास्तव्याला आहेत. तीसएक वर्षांपूर्वी त्यांच्या सहचारिणीचं निधन झाल्यानंतर ते एकाकी पडले.कुणी,घर देता का रे? घर? असं म्हणत अख्खी रात्र डोंबिवलीतील रस्त्यावर काढत आश्रयासाठी याचना केली. ही बाब मनसेचे पश्चिमेकडील शाखाध्यक्ष संकेत तांबे यांच्या नीदर्शनास आली, त्यांनी सहस्त्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधत विचारपूस केली. तेव्हा त्यांनी हतबल होत आसरा हवा असल्याचे सांगितले. तांबेनी लगेचच प्रल्हाद म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. त्यानूसार म्हात्रेंनी तातडीने साधना आधार वृद्ध सेवा केंद्राच्या संचालिका सुमिधा थत्ते यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ मासिक भाडे सात हजार भरून सहस्रबुद्धेंना आधार दिला. शुक्रवारी विश्वनाथ सहस्रबुद्धेंचं पालकत्व स्वीकारण्यासाठी वृद्धाश्रमातील जी कायदेशीर औपचारिकता हवी होती, ती डिपॉझिट भरून पूर्ण केली. त्यावेळी महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी अ‍ॅड. प्रदीप बावस्कर, विभागाध्यक्ष वेदप्रकाश पांडे, विजय शिंदे, संदीप उर्फ रमा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अजित लेले आदि उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसेdombivaliडोंबिवलीRaj Thackerayराज ठाकरे