शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर, ओवेसींची बदलापुरातील सभा गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:40 IST

कार्यकर्त्यांचा हिरमोड; हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारली

बदलापूर : भिवंडी लोकसभेचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीने बदलापुरात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा बुधवारी आयोजित केली होती; मात्र नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी न मिळाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भरवशावरच सभा गुंडाळण्यात आली. रणरणत्या उन्हातही या सभेसाठी कार्यकर्ते जमले होते; मात्र नेते येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर ते माघारी फिरले.भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी बदलापूरच्या सभेसाठी वेळ दिली होती. कसारा येथील सभा आटोपल्यावर दोन्ही नेते बदलापूरच्या सभेसाठी येणार होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांची जमवाजमवदेखील झाली होती.सभेची वेळ दुपारी १२ वाजताची होती; मात्र दुपारचे २ वाजले तरी नेते येत नसल्याचे पाहून, रणरणते ऊन डोक्यावर घेतलेल्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला. हळूहळू कार्यकर्त्यांनी घरचा रस्ता पकडण्यास सुरुवात केली. सभेसाठीची वेळ ही दुपारी २ वाजेपर्यंतची तोपर्यंत सभा आटोपणे बंधनकारक होते. अखेर, सभेच्या आयोजकांनी नेते मंडळी येणार नसल्याचे जाहीर करून स्थानिक पुढाऱ्यांची भाषणे सुरू केली.दरम्यान, यासंदर्भात बदलापूर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, हेलिकॉप्टर उतरवण्याच्या परवानगीबाबत त्यांनी नकारात्मक अहवाल दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण दिले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमांवर बोट ठेवले. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत परवानगी मिळवणे वंचित आघाडीच्या नेत्यांना शक्य झाले नाही.दुसरीकडे, हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी नसतानाही स्थानिक पदाधिकारी नेत्यांची वाट पाहत बसले होते; मात्र दोन्ही नेते वसईला सभेसाठी जाणार असल्याने त्यांना बदलापूरला येणे शक्य झाले नाही. परवानगी मिळाली असती, तर ते दोन्ही नेते सभेसाठी येणार होते. मात्र, परवानगी नाकारल्याने त्यांनी कसाºयाची सभा आटोपून थेट वसई गाठली. तेथील सभेसाठीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच असल्याने, ती आटोपून येणे नेत्यांना शक्य नव्हते.सभेची पूर्ण तयारी झाली होती; मात्र हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी जाणीवपूर्वक देण्यात आली नाही. वसई येथील सभेच्या नियोजनानुसार ती आटोपल्यानंतरही नेत्यांना बदलापुरात येणे शक्य नव्हते. त्यामुळे नेत्यांच्या अनुपस्थितीत ही सभा घेण्यात आली.- डॉ. अरुण सावंत, उमेदवारहेलिकॉप्टर उतरवण्यासाठी कसारा, भिवंडी या शहरांत परवानगी मिळालेली आहे; मात्र बदलापुरात परवानगीसाठी स्थानिक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल नियमानुसार नकारात्मक होता. नियमांची पडताळणी केल्यानंतर, बदलापुरात सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी देणे शक्य झाले नाही.- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी