खेळता खेळताच लहानगा पडला खड्ड्यात अन् केला जिवानिशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 08:43 IST2019-01-31T08:43:02+5:302019-01-31T08:43:30+5:30

विटा पाडण्याच्या कामात गुंतलेल्या दाम्पत्याचा मुलाचा  खेळता-खेळता माती कालविण्यासाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू झाला.

In the potholes, Kya Jivanshi, | खेळता खेळताच लहानगा पडला खड्ड्यात अन् केला जिवानिशी

खेळता खेळताच लहानगा पडला खड्ड्यात अन् केला जिवानिशी

भिवंडीः तालुक्यातील जुनांदुर्खी गावातील खारागोरा पाड्यावर विटा पाडण्याच्या कामात गुंतलेल्या दाम्पत्याचा मुलाचा  खेळता-खेळता माती कालविण्यासाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू झाला. हर्षल संजय शिंदे (३) असे मुलाचे नाव असून, त्यास वीटभट्टीजवळ तात्पुरता रहाण्यासाठी बनविलेल्या झोपडीत ठेवून मुलाचे आईवडील वीटभट्टीवर काम करीत होते.

सायंकाळी थापण्याच्या खड्ड्यात पडून बुडाल्याने एका तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील जुनांदुर्खी (खारागोरा) येथे घडली आहे. हर्षल संजय शिंदे (३ वर्षे) असे खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. काम संपल्यानंतर वडिलांनी मुलाचा शोध घेतला असता तो पाय घसरून खड्ड्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: In the potholes, Kya Jivanshi,