शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

मॅरेथॉन मार्गावर खड्ड्यांची स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:18 IST

तत्काळ बुजवण्याचे महापौरांचे आदेश; प्रशासनाची २ सप्टेंबरची डेडलाइन

ठाणे : येत्या २ सप्टेंबर रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रंगणार आहे. शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी पार चाळण केली असून, त्यामुळे यंदासुद्धा या स्पर्धकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढून स्पर्धा जिंकावी लागणार आहे.येत्या २ सप्टेंबर रोजी २९ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रंगणार आहे. दरवर्षी या स्पर्धेत २० ते २५ हजार स्पर्धक सहभागी होतात. त्यात अनेक स्पर्धकांना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. पराभूत स्पर्धकांनी या खड्ड्यांवर अपयशाचे खापर फोडल्याचे प्रकार यापूर्वी बरेचदा घडले आहेत. रस्त्यांची ही दूरवस्था यावेळीही कायम आहे; उलटपक्षी कितीतरी पटीने वाढली आहे. शहरातील रस्त्यांच्या या दूरवस्थेबाबत सर्वस्तरावर ओरड झाली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याचा फटका आता महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला बसणार आहे. यंदा खड्डेमुक्त स्पर्धा व्हावी, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने शुक्रवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मॅरेथॉनच्या सर्वच मार्गांची पाहणी केली. या पाहणीमध्ये जवळजवळ सर्वच मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे स्पर्धेपूर्वी ते बुजवण्यात यावेत, असे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदींसह पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.प्रशासनाविषयी सर्वत्र नाराजीघोडबंदरचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे उखडला आहे. काही ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या फुटल्या असून केबल वर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर स्पर्धकांनी धावायचे कसे, असा सवाल करून महापौरांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.या मार्गावरील वागळे डेपो, साठेनगर, इंदिरानगर चौक, सावरकरनगर, कोरस चौक, रुणवाल, देवदया ते नीलकंठ, पोखरण रोड नं. २, मानपाडा सेवारस्ता, हिरानंदानी इस्टेट प्रवेशद्वार येथे खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे महापौरांनी तत्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणेMarathonमॅरेथॉन