निळजे गावातील पोस्ट आॅफिस तेथेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:05 IST2018-03-23T18:05:47+5:302018-03-23T18:05:47+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील निळजे गावातील पोस्ट आॅफिस ते लोढा पलावा सिटीमध्ये हलविण्याच्या विरोधात निळजे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध सुरू केला. नागरिकांच्या भावनांची दखल खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावर सिन्हा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सध्या अस्तित्वात असलेले पोस्ट आॅफिस हलवले जाणार नाही याची ग्वाही दिली.

The post office in the village of Nilje will remain there | निळजे गावातील पोस्ट आॅफिस तेथेच राहणार

खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली केंद्रिय मंत्री मनोज सिन्हांची भेट

ठळक मुद्देखासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली केंद्रिय मंत्री मनोज सिन्हांची भेटतात्काळ आदेश देण्यात येणार

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील निळजे गावातील पोस्ट आॅफिस ते लोढा पलावा सिटीमध्ये हलविण्याच्या विरोधात निळजे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध सुरू केला. नागरिकांच्या भावनांची दखल खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावर सिन्हा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सध्या अस्तित्वात असलेले पोस्ट आॅफिस हलवले जाणार नाही याची ग्वाही दिली.
तसेच या पोस्ट आॅफिसचे नावही बदलले जाणार नाही असेही आश्वासन दिले. निळजे गावातील लोकांनी गावातच पोस्ट आॅफिससाठी जागा उपलब्ध करून देण्यास येथील गावक-यांनी तयारी दाखविली असल्याचेही खा.डॉ. शिंदे यांनी त्यांना सांगितले. त्यावर पलावा येथे सुरू होणारे पोस्ट आॅफिस निळजे गावातच सुरू राहण्याच्या दृष्टीने संबंधित अधिका-यांना तात्काळ आदेश देण्यात येणार असल्याचे आश्वासन सिन्हा यांनी दिले.

Web Title: The post office in the village of Nilje will remain there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.