शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

बंटी-बबली ताब्यात, मॅजिक पेनची कमाल, कर्जदारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:20 AM

कर्ज वळते करण्यासाठी स्टेट बँकेच्या नावे घेतलेल्या धनादेशावरील नाव आणि रक्कम मॅजिक पेनने बदलून लोकांची फसवणूक करणारी बंटी आणि बबलीची जोडी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

ठाणे : कर्ज वळते करण्यासाठी स्टेट बँकेच्या नावे घेतलेल्या धनादेशावरील नाव आणि रक्कम मॅजिक पेनने बदलून लोकांची फसवणूक करणारी बंटी आणि बबलीची जोडी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. राज्यभरात अनेक कर्जदारांना त्यांनी गंडा घातला आहे.जहीर काजी निझाम आणि सारिका बबन इनामदार ही आरोपींची नावे आहेत. लोकांना फसविण्याची त्यांची कार्यपद्धती मजेशीर आहे. शहरातील नामांकित डॉक्टर किंवा मोठ्या व्यावसायिकांची यादी आरोपी जस्ट डायल या संकेतस्थळावरून मिळवायचे. सावज निश्चित झाले की स्टेट बँकेचा गणवेश घालून जहीर त्याची प्रत्यक्ष भेट घ्यायचा. आपले कर्ज बँकेमध्ये वळते केल्यास कर्जाचे हफ्ते कसे कमी होतील, हे तो सावजाला समजावून सांगायचा. सावज तयार झाला की, त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ३00 ते ३५0 रुपये एवढे नाममात्र शुल्क आणि तेदेखील धनादेशाच्या स्वरूपात घेतले जायचे. धनादेश ‘एसबीआय’च्या नावे आणि तोही अकाऊंट पेयी द्यायचा असल्याने जहीरवर कुणीही संशय घेत नव्हते. धनादेश लिहिण्यासाठी जहिर बोलण्याच्या ओघात स्वत:चा मॅजिक पेन द्यायचा. तेथून निघाल्यानंतर धनादेशावरील एस.बी.आय.च्या प्रत्येक अक्षरामध्ये मोकळी जागा असल्यास एसच्या पुढे सारिका, बीच्या पुढे बबन आणि आयच्या इनामदार लिहून जहिर त्याच्या महिला साथीदारास बँकेत पाठवायचा. मॅजिक पेनने अकाउंट पेयी धनादेशावरील रेषा खोडून तो बेअरर केला जायचा. त्यामुळे जहीरची साथीदार सारिका तो धनादेश बँकेतून लगेच वठवायची. तत्पूर्वी धनादेशावरील रक्कमही आरोपी वाढवायचे. आरोपींनी या पद्धतीने राज्यभरात गंडा घातला.जहिर मूळचा सातारा येथील असून, त्याच्याजवळून हस्तगत केलेल्या मोबाईल फोनमध्ये जवळपास ५0 डॉक्टरांचे नंबर पोलिसांना आढळले. या सर्वांची त्याने फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. स्कोडासारख्या महागड्या गाडीत फिरणारा जहीर मोबाईल फोन वेळोवेळी बदलायचा. फसवणुकीच्या प्रत्येक प्रकरणासाठी तो नवीन मोबाईल फोन आणि सीम कार्ड विकत घ्यायचा. फसवणुकीचे एक प्रकरण झाले की तो मोबाईल फोन जहिर ‘ओएलएक्स’वर विकायचा. नवीन प्रकरणासाठी दुसरा मोबाईल फोनही ‘ओएलएक्स’वरूनच विकत घ्यायचा. मालवणी येथे त्याला अशाच एका प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. तेथून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा हा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.६0 ठिकाणी शोधजहीर राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलायचा. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोेलीस निरीक्षक शिवाजीराव चव्हाण बरेच दिवसांपासून त्याच्या मागावर होते. धुळ्यापासून मुंबईतपर्यंतचे जवळपास ५0 ते ६0 पत्ते शोधून काढल्यानंतर, ही जोडी पोलिसांच्या हाती लागली.

टॅग्स :Crimeगुन्हा