प्लास्टरसह पीओपी कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:09+5:302021-08-26T04:43:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पश्चिमेतील आर्चिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या छताला असलेले प्लास्टर कोसळून पिता-पुत्र किरकोळ जखमी झाल्याची ...

POP collapsed with plaster | प्लास्टरसह पीओपी कोसळले

प्लास्टरसह पीओपी कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : पश्चिमेतील आर्चिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या छताला असलेले प्लास्टर कोसळून पिता-पुत्र किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. मकरंद आणि अभिजित जावडेकर, अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत. या घटनेत मोठी हानी टळली असली तरी घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

आर्चिस इमारत रेल्वे स्थानकाजवळ असून, १९९५ सालचे बांधकाम असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ज्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली तो रिकामा करण्यात आला असून, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. ही इमारत धोकादायक आहे का, हे यातून समोर येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती ‘क’ प्रभाग क्षेत्राचे प्रभारी अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

फोटो आहे

--------------

Web Title: POP collapsed with plaster