पालिकेच्या रुग्णालयामधील पीओपी सिलिंग पडली; कोणालाही दुखापत नाही
By अजित मांडके | Updated: June 26, 2023 09:44 IST2023-06-26T09:44:42+5:302023-06-26T09:44:50+5:30
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालिकेच्या रुग्णालयामधील पीओपी सिलिंग पडली; कोणालाही दुखापत नाही
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील हृदयरोग विभागाच्या समोरील चालण्याच्या जागेमधील पीओपी (प्लास्टर) सिलिंग पडल्याची घटना रविवारी (२५ जून) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सुमारे १०० मीटर लांब असलेल्या पीओपी सिलिंग पैकी २० मीटर पीओपी सिलिंग पडली असून उर्वरित सिलिंग धोकादायक झाली असल्याने ती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.