शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रुग्णालयावरून तापले राजकारण; मीरा-भाईंदरमधील सत्ताधाऱ्यांना उशिराने जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:52 IST

वायफळ खर्चास जैन यांचा विरोध, आ. सरनाईक यांनी मैदानातील रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. याबाबत १८ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

मीरा रोड : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी दोन हजार ९६५ खाटांपैकी तब्बल एक हजार ८४९ खाटा रिक्त असतानाही १२ कोटी खर्चून मैदानात उभारल्या जाणाºया ७०० खाटांच्या कोरोना रुग्णालयास सत्ताधारी भाजपला उशिरा का होईना जाग आली. भाजपसह अपक्ष आमदार गीता जैन यांनी या वायफळ खर्चास विरोध दर्शवला आहे. यावरून आमदार प्रताप सरनाईक विरुद्ध भाजप, गीता जैन अशी जुंपली आहे.

भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात सुरुवातीला एक हजार खाटांचे रुग्णालय मंडप उभारून बांधणार, असे सांगितले होते. पण, आता ७०० खाटांचेच हे रुग्णालय असेल. १२ जुलैला जेव्हा या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली, तोपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बंदिस्त सभागृह, एमएमआरडीए योजनेतील, खाजगी विकासकांच्या इमारती, राधास्वामी सत्संगमधील मोठ्या शेड, रुग्णालये उपलब्ध झाली. असे असतानाही धारावी डेकोरेटर्स याला १० कोटी ३३ लाखांचे कंत्राट दिले. हा खर्च १२ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. २० दिवसांत कंत्राटदाराने मंडप व आतील व्यवस्था उभारून द्यायची होती. पण, अजून हे काम पूर्ण झालेले नाही.

आ. सरनाईक यांनी मैदानातील रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. याबाबत १८ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. कंत्राटदारास कार्यादेश मिळाला व त्यानंतरही काम सुरू होऊन आॅगस्ट संपायला आला, तरीही उघड विरोध असा केलाच नाही. सभापती अशोक तिवारी यांनी मात्र पत्र देऊन १२ कोटींचा अनावश्यक खर्च करू नका, असे आयुक्तांना कळवले होते. महापौर ज्योत्स्ना हसनाळे, भाजप नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास, सुरेश खंडेलवाल आदी नगरसेवकांनी हा खर्च वायफळ असल्याचे सांगून पालिकेच्या इंदिरा गांधी किंवा जोशी रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी खर्च करा, अशी मागणी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी रुग्णवाढ झाल्यास धावपळ होऊ नये यासाठी हे रुग्णालय बांधत आहोत, असे उपायुक्त संभाजी वाघमारे म्हणाले.एक हजार ८४९ खाटा रिक्तसध्या तीन कोविड केअरमध्ये एक हजार ८१६ रुग्णांची क्षमता आहे. परंतु, सध्या एक हजार २४० खाटा शिल्लक आहेत. तर, १४ रुग्णालयांमध्ये ५५८ खाटा असून त्यातील १८१ खाटा रिक्त आहेत. सात कोविड उपचार केंद्रांत ५९१ खाटा असून त्यातील ४२८ खाटा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या दोन हजार ९६५ खाटांपैकी तब्बल एक हजार ८४९ खाटा रिक्त असताना हा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.खर्च टाळल्यास बरे होईलअपक्ष आमदार गीता जैन म्हणाल्या की, सध्याची रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा पाहता या मैदानातील रुग्णालयावरचा खर्च टाळल्यास बरे होईल. १२ कोटी शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यावर खर्च केल्यास त्याचा सदुपयोग होईल.भाजपने केवळ भ्रष्टाचार केला : भाजपने पालिकेत सत्ता असताना केवळ भ्रष्टाचार केला असून नागरिकांच्या आरोग्याची काळजीच घेतली नाही. गीता जैन शिवसेनेच्या बळावर निवडून आल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आॅनलाइन उद्घाटन झाले तेव्हा होत्या. पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून कामे करून घेतात आणि आता कोविड रुग्णालयाला विरोध करतात, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpratap sarnaikप्रताप सरनाईक