शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नेत्याची मर्जी राखत अधिकाऱ्यांच्या बदल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 3:57 AM

भार्इंदर पालिका : दादासाहेब खेत्रे पुन्हा सेवेत

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिकाºयांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत. एका नेत्याची मर्जी जपत बदल्या झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एका नेत्याची मर्जी झाल्याने पालिका सेवेतून बाहेर ठेवलेल्या दादासाहेब खेत्रे यांना त्याच नेत्याच्या मर्जीनंतर पुन्हा सेवेत रूजू करून घेत आता महत्वाच्या बेकायदा बांधकाम नियंत्रण प्रमुखपदासह जाहिरात विभाग दिला आहे.

खेत्रे यांच्याकडे परवाना व वाहन विभाग होता. त्या पदावर असलेले संजय दोंदे यांना भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग समिती तीनचे प्रभाग अधिकारी नियुक्त केले असून सोबत परवाना विभाग दिला आहे. येथे प्रभाग अधिकारी असलेले गोविंद परब यांना भार्इंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती दोनमध्ये नेमले आहे. परब हे कामगार सेनेत असल्याने व त्या नेत्याशी संबंधित बांधकामांच्या तक्रारींवर कारवाई करण्यास घेतल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. तर दोंदे हे त्या नेत्याच्या मर्जीतले मानले जातात.

मीरा रोडच्या प्रभाग पाचचे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना प्रभाग समिती चारमध्ये सुनील यादव यांच्या जागी नेमले आहे. तर यादव यांना बाजार फी वसुली व अभिलेख विभागात पाठवले आहे. प्रभाग समिती एकचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांना मीरा रोडच्या प्रभाग समिती पाचमध्ये नियुक्त केले असले तरी गोडसे रजेवर असल्यानेच समिती एकचा पदभार परब यांनी तर समिती पाचचा पदभार चंद्रकांत बोरसे यांनी सांभाळायचे आदेश आहेत. प्रभाग समिती दोनचे जगदीश भोपतराव यांना वाहन व पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये नेमले आहे. आस्थापना अधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांना परिवहन उपव्यवस्थापकाचा अतिरीक्त पदभार सोपवला आहे.आयुक्तांच्या आदेशानुसारच बदल्या केल्या असून यात राजकीय हस्तक्षेप नसतो. पालिकेचे काम प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यकतेनुसार बदल्या केल्या आहेत.- विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे