मीरारोड - मीरारोड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरवलेले १५ मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत केले. मीरा रोड पोलीस ठाण्यात वर्षभरात बस, टॅक्सी, रिक्षा, दुकान आदी ठिकाणी मोबाईल विसरल्याच्या अथवा हरवल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी तपास करत हरवलेल्या काही मोबाईलचा शोध घेत ते हस्तगत केले. पोलीस ठाण्यात "पोलीस स्थापना दिन सप्ताह" निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या हस्ते १५ मोबाईल मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल आदी उपस्थित होते. मोबाईल हरवला वा चोरीला गेल्यास त्याचा कोणी गैरवापर करू नये याकरता पोलीस ठाण्यात वा ऑनलाइन तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून १५ मोबाईल फोन मूळ मालकांना परत
By धीरज परब | Updated: January 5, 2023 18:29 IST