शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस पतीस सक्तमजुरी

By admin | Updated: February 6, 2016 02:17 IST

पोलीस पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल तथा पतीस ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती

ठाणे : पोलीस पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल तथा पतीस ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. बांबर्डे यांनी शुक्रवारी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ही घटना घडली, त्या वेळी मयत ही सात महिन्यांची गरोदर होती.कळव्यातील श्रीराम हिरवे (३०) असे शिक्षा सुनावलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो ठाणेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याचे २०१३ मध्ये मुंबई पोलीस दलातील मृत अर्चना हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, श्रीरामला मामे बहिणीशी लग्न करायचे असल्याने त्याने अर्चनाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, ती सात महिन्यांची गरोदर असताना तिने पतीच्या छळास कं टाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. यामध्ये ती १०० टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तिचा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल अभिजित मोरे याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी हिरवे याला अटक केली होती. हे प्रकरण ठाणे अतिरिक्त न्यायमूर्ती बांबर्डे यांच्या न्यायालयात आल्यावर शुक्रवारी सरकारी वकील बी.डी. हिंगे यांनी तर फिर्यादीच्या वतीने विशेष वकील म्हणून मनीषा परदेशी आणि राजेश मोरे यांनी युक्तिवाद केला. त्यात श्रीराम दोषी आढळला. त्याला पत्नीच्या मृत्यूस जबाबदार धरून न्या. बांबर्डे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर, एक हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. (प्रतिनिधी)