शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या आधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 19:04 IST

उत्तन येथील अनधिकृत चाळीच्या बांधकामावर पुन्हा कारवाई करु नये म्हणुन तीन लाख रुपयांची मागणी करणा-या व दुसरा हप्त्याची एक लाखांची रक्कम...

मीरारोड - उत्तन येथील अनधिकृत चाळीच्या बांधकामावर पुन्हा कारवाई करु नये म्हणुन तीन लाख रुपयांची मागणी करणा-या व दुसरा हप्त्याची एक लाखांची रक्कम स्विकारणा-या मीरा भार्इंदर महापालिकेचा प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह त्याचा चालक राजेंद्र खेडेकर या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या मुळे अनधिकृत बांधकामांना पालिकेचा आशिर्वाद असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.उत्तनच्या स्टेला मॉरीस रुग्णालया जवळ मुनावर शेख यांनी ९ - ९ खोल्यांच्या दोन चाळी खाजगी जागेत बांधल्या होत्या. सदर चाळी अनधिकृत असल्याने काही राजकिय पदाधिकारी तसेच तथाकथीत लोकांनी तक्रारी चालवल्या होत्या. या मध्ये बहुतांशी तक्रारी ह्या अर्थपुर्ण असल्याचे सांगीतले जाते. दरम्यान तक्रारीं वरुन पालिकेने सदर चाळीवर तोडक कारवाई केली होती. परंतु निवडणुक काळात पुन्हा बेकायदा बांधकाम करण्यात आले.दरम्यान या प्रकरणी प्रभाग समिती क्र. १ चे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी शेख यांना चाळीवर पुन्हा तोडक कारवाई करायची नसेल तर ६ लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर ३ लाखांवर सौदा ठरला. एक लाख रुपये आधीच सावंत यांनी त्यांचा चालक खेडेकर मार्फत घेतले होते. त्या नंतर उर्वरीत पैशांसाठी सावंत यांनी तगादा लावला होता.त्या अनुषंगाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक वाल्मीक पाटील व त्यांच्या पथकाने आज मंगळवारी १ लाख रुपयांचा दुसरा हप्ता शेख यांच्या कडुन स्विकारताना खेडेकर सह सावंत यांना अटक केली.अटक आरोपींना भार्इंदर पोलीस ठाण्यात आणुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. दरम्यान सावंत याच्या निवासस्थान आदी ठिकाणी धाड टाकण्यात आल्याचा पोली सुत्रांनी सांगीतले. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी आलेल्या तक्रारी तसेच अन्य लोकांनी देखील पैशांची मागणी केली असल्याचची चर्चा असुन पोलीसांनी मात्र तपासात सबळ पुरावी हाती लागल्यास अन्य संबंधितां विरुध्द पण आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगीतले.सावंत यांना पालिका मुख्यालयाचे अभयप्रभाग समिती क्र. १ च्या अखत्यारीत जय अंबे नगर पासुन मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, उत्तन, चौक आदी मोठा परीसर येत असुन या भागात बेधडक अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. अगदी आयुक्तां पर्यंत येथील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी येत असताना कारवाई मात्र होत नव्हती. दुसरी कडे सावंत यांच्यावर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्याचा ठपका पालिकेने ठेवत त्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावीत केली होती. परंतु उपायुक्त मुख्यालय यांच्या अखत्यारीत असलेल्या आस्थापना विभागा कडुन मात्र सावंत यांच्यावर कारवाईस टोलवाटोलवी केली जात होती. सावंत यांना वेळीच निलंबित केले असते तर आज पालिकेच्या माथी आणखी एक लाचखोरीचा ठपका बसला नसता असे समोर आले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPoliceपोलिस