महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवणारा शिपाई अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:24 IST2019-09-02T01:24:14+5:302019-09-02T01:24:18+5:30

पोलिसांनी मोबाइलमधील व्हिडीओ तपासले असता, त्यामध्ये तिचाही व्हिडीओ आढळून आला.

Police detain cops for making pornographic videos | महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवणारा शिपाई अटकेत

महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवणारा शिपाई अटकेत

मुंब्रा : बँकेतील शौचालयात जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे अश्लील व्हिडीओ बनवणाºया बँकेतील शिपायाला मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. दिव्यातील एका खाजगी बँकेत कार्यरत असलेली महिला बँकेत असलेल्या शौचालयात गेली होती. तेथून बाहेर निघत असताना तिला शौचालयात कुणीतरी मोबाइल लपवून ठेवल्याचे तसेच त्याचा कॅमेरा सुरू असल्याचे आढळून आले. या महिलेने याबाबतची तक्र ार दिवा पोलीस चौकीमध्ये केली.

पोलिसांनी मोबाइलमधील व्हिडीओ तपासले असता, त्यामध्ये तिचाही व्हिडीओ आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई केली. बँकेत जाऊन तो मोबाइल कुणाचा होता, याची चौकशी केली आणि ज्याचा तो मोबाइल होता, त्या बँकेतील संजय नावाच्या शिपायाला अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Police detain cops for making pornographic videos