ठाणे - विजयाशदमीनिमित्त ठाणे शहर पाेलीस आयुक्तायातील आपल्या शस्त्रास्त्रांचे पाेलीस आयुक्ता आशुताेष डुंबरे आणि सह पाेलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने पूजन करण्यात आले. यावेळी डुंबरे यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देऊन आपटयांच्या पानांचे वाटप केले.
प्रथेप्रमाणे ठाणे पाेलिसांनी यंदाही ठाण्यातील सिद्धी सभागृह याठिकाणी मुख्यालयाच्या शस्त्रागारातील शस्त्रांचे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विधीवत पूजन केले. पाेलीस आयुक्त डुंबरे यांच्यासह सह आयुक्त डाॅ. चव्हाण, अतिरिक्त पाेलीस आयुक्त श्रीकांत पाठक, विनायक देशमुख, ठाणे शहरचे उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त प्रशांत कदम आदी अधिकाऱ्यांनी हे पूजन केले.
असे झाले शस्त्रपूजन ठाणे शहर पाेलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारातील एसएलआर (सेल्फ लाेडेड रायफल), कार्बाइन, नऊ एमएम पिस्टल, रिव्हाॅल्व्हर आणि गॅसगन तसेच एकाच वेळी ३० काडतुसे साेडणारी एकेएम ( अझाल्ट क्लासिनकाे माइल्ड) आणि एकावेळी ३० राऊंड फायर हाेणारी एलएमजी (लाईट गन मशिन) आदी शस्त्रांचे फूल हारांसह शस्त्रांचे पाेलीस आयुक्तांसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पूजन केले. गणेशाेत्सव आणि नवरात्रीचा बंदाेबस्त शांततेत पार पडल्यानंतर गुरुवारी हे अधिकारी यानिमित्त एकत्र आले. यावेळी पोलीस प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना दसरा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा देत अपट्याची पाने देखील वाटत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
Web Summary : Thane Police Commissioner and Joint Commissioner traditionally worshipped weapons on Vijayadashami. They exchanged best wishes and distributed leaves to officers and staff. Various weapons were ritually honored at Siddhi Hall.
Web Summary : ठाणे पुलिस आयुक्त और संयुक्त आयुक्त ने विजयदशमी पर पारंपरिक रूप से हथियारों की पूजा की। उन्होंने अधिकारियों और कर्मचारियों को शुभकामनाएं दीं और पत्ते बांटे। सिद्धि हॉल में विभिन्न हथियारों का विधिपूर्वक सम्मान किया गया।