शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कळवा बार व्यवस्थापकासह तिघांना मारहाण : पोलीस हवालदार संख्ये निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:59 IST

जेवणाचे बिल देण्यावरून उद्भवलेल्या वादातून कळवा पोलीस ठाण्याचा हवालदार प्रवीण संख्ये याने एका बारच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याची गंभीर दखल घेऊन संख्ये याला निलंबित करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी दिले आहेत.

ठाणे, दि. 4 -  जेवणाचे बिल देण्यावरून उद्भवलेल्या वादातून कळवा पोलीस ठाण्याचा हवालदार प्रवीण संख्ये याने एका बारच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याच घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेऊन संख्ये याला निलंबित करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी दिले आहेत.दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जन बंदोबस्तानंतर संख्ये हा त्याच्या काही सहकाऱ्यांसह कळव्याच्या सायबा बारमध्ये जेवणासाठी २६ आॅगस्ट रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास बसला. जेवण झाल्यानंतर वेटरने त्यांच्या बिलामध्ये अन्य टेबलावरील पोलिसांचे बिलही त्यात मिळवून दिले. त्यांच्याकडे दोन हजार २०० रुपयांचे हे बिल सोपवण्यात आले. इतरांचे बिल आमच्या बिलामध्ये का दिले, असा संख्ये यांनी वेटर जयेनकुमार पुयी, मॅनेजर प्रेम पुजारी आणि खजिनदार लोकेश घेवाडिया यांना जाब विचारला. त्यावर पोलीस लोग ऐसे ही कन्सेशन माँगते है, कभी आधाही बिल भरते है, असे मॅनेजरने टोमणे मारण्यास सुरुवात केली. याचाच राग आल्याने संख्येने वेटर, मॅनेजर आणि कॅशिअर या तिघांनाही मारहाण केली. या मारहाणीची तक्रार बारचे चालक उमेश करकेरा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांच्याकडे केली. याच तक्रारीच्या प्रती कळव्याचे सहायक आयुक्त, उपायुक्तांसह हॉटेल असोसिएशनकडे दिल्या. या तक्रारीची पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही करकेरा यांनी केला. ४ आॅगस्टला या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताच उपायुक्त स्वामी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संख्येला चौकशीच्या अधीन राहून तडकाफडकी निलंबित केले, तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे.‘‘बारमालक करकेरा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात कळवा पोलीस ठाण्याचे हवालदार संख्ये हे हॉटेलमधील मॅनेजरसह तिघांना मारहाण करताना आढळले. त्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, उर्वरित सहा जणांची चौकशी सुरूकेली आहे. २२०० रुपयांचे हे बिल असून ते त्यांनी अदाही केले. परंतु, मारहाणीसारखा प्रकार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.’’रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त, कळवा विभाग

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा