ठाण्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 08:54 PM2018-08-15T20:54:34+5:302018-08-15T21:11:09+5:30

महिला तसेच अल्पवयीन मुली आणि मुलांनी लैंगिक छळवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी ्रघेतली पाहिजे. याशिवाय, आर्थिक फसवणूकीपासून काय सावधानता बाळगावी, अशा विविध बाबींचे ठाणे पोलिसांनी कोपरीतील महिलांना मंगळवारी मार्गदर्शन केले.

Police awareness campaign for women safety in Thane | ठाण्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले समुपदेशन

googlenewsNext
ठळक मुद्दे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले समुपदेशनठाणे पोलिसांचा उपक्रममागील तक्रारींचाही घेतला आढावा






ठाणे : महिलांची विविध मार्गांनी होणारी आर्थिक फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळवणूक यातून त्यांनी कशी काळजी घ्यावी, पालक आणि शिक्षकांच्या जबाबदा-या अशा अनेक बाबींचा आढावा घेऊन कोपरीमध्ये ठाणेपोलिसांनी मंगळवारी सायंकाळी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी महिलांना वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मार्गदर्शन केले.
‘आनंद बँक्वेट हॉल’ येथील या उपक्रमाला परिसरातील सुमारे ७० महिला उपस्थित होत्या. प्राची झाडे हिचा एकतर्फी प्रेमातून खून झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या तक्रारींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून या चर्चासत्राचे आयोजन होते. यावेळी कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड, निरीक्षक दत्ता गावडे, श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील, कोपरी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक शेरेकर यांच्यासह सायबर सेलच्या अधिकाºयांनीही मार्गदर्शन केले.
पूर्वी लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात सात ते २० वर्षांपर्यंत शिक्षा होती. ती आता फाशीपर्यंत वाढवण्यात आली आहे. लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारांच्या शिक्षेतही वाढ केली आहे. त्यामुळे अशा घटनांकडे पालक आणि मुलामुलींनी दुर्लक्ष न करता पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले. अशा घटनांच्या वेळी समाजाची, शिक्षकांची, पालकांची आणि पोलिसांचीही कशी महत्त्वाची जबाबदारी आहे, याचा आढावा सुलभा पाटील यांनी घेतला. तर, बाललैंगिक अत्याचार कसे होतात, ते कसे रोखता येतील, याचे समुपदेशन गावडे यांनी केले.
दहावीच्या आतील मुलांकडे शक्यतो मोबाइल फोन देऊ नका. कोणतीही गोष्ट मोफत मिळत नाही. त्यामुळे लॉटरीतील पैसे देण्याच्या, नोकरी लावण्याच्या, फेसबुकवरून मैत्री करण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक फसवणूक करतील, महिलांची अशा घटनांमध्ये लैंगिक छळवणूकही होते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अशाच काही घटना असतील तर जवळच्या पोलिसांना माहिती द्या, असेही आवाहन पोलिसांनी केले.
...........................
फोनवरून कोणतीही माहिती देऊ नका
फोनवरून कोणीही बँक किंवा इतर खासगी माहिती विचारल्यास ती देऊ नका. एटीएम किंवा बँकेशी संबंधित माहिती घेऊन बँकेतून पैसे काढले जातात. तसेच परदेशी मुलाशी लग्नाचे आमिष दाखवून मॅट्रोमोनियल साइटवरूनही फसवण्यात येते. तसेच खासगी फोटोही सोशल मिडीयातून शेअर करतांना काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पालकांनीही सतर्कता बाळगली पाहिजे, असाही सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी मागील काही तक्रारींचाही पोलिसांनी मागोवा घेतला.

Web Title: Police awareness campaign for women safety in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.