शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप

By सुरेश लोखंडे | Updated: September 28, 2025 11:49 IST

मुंबईला पळून गेलेला ड्रग्ज माफिया पाेलिस अधिकाऱ्यांना माहीत असून त्याला पोलिसांचेच अभय आहे, असा आराेपही त्यांनी केला. 

सुरेश लाेखंडेलाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :  भिवंडी शहर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडले असून, अनेक तरुणांना या विषारी जाळ्यात अडकवणाऱ्या ड्रग्ज माफियांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खा. सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी केली. मुंबईला पळून गेलेला ड्रग्ज माफिया पाेलिस अधिकाऱ्यांना माहीत असून त्याला पोलिसांचेच अभय आहे, असा आराेपही त्यांनी केला. 

भिवंडीतील अनेक लहान मुले महामार्गावरून होणाऱ्या ट्रकच्या वाहतुकीच्या माध्यमातून ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एक महिला भेटली. तिचा १७ वर्षांचा मुलगा ड्रग्जच्या आहारी गेला होता. भिवंडीत ड्रग्स पुरवठा करणारा मुख्य डीलर मुंबईला पळून गेला असून, अजूनही त्याचे काही साथीदार भिवंडीमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा आणि भिवंडी शहराला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवा’ असे साकडे म्हात्रे यांनी घातले. 

सभागृह अवाक्

पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाेलिसांनी तत्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले. भिवंडीतील ड्रग्ज डिलरची माहिती पाेलिसांना असल्याचे म्हात्रे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देताच सभागृह अवाक् झाले. भिवंडीतील ट्रक पार्किंग प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे प्रलंबित आहे. शासनाने या प्रकल्पात ४० टक्के सहकार्य करावे’, अशी मागणी त्यांनी केली. वराळादेवी तलाव प्रकल्पाला केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासन व भिवंडी महापालिकेने निधी देण्याची मागणीही म्हात्रे यांनी केली.

परिस्थिती  विदारक आहे.  शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलेही ड्रग्जच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे ड्रग्ज माफियाला गजाआड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, ड्रग्ज माफियाला पोलिसांचे अभय असल्याचा आरोप त्यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi drug mafia shielded by police, alleges MP Suresh Mhatre.

Web Summary : MP Suresh Mhatre accuses Bhiwandi police of protecting drug mafia, leading youth into addiction. He demanded immediate action, revealing a Mumbai-based dealer and local accomplices. Minister Eknath Shinde ordered a strict probe.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीDrugsअमली पदार्थ