शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी आर्थिक घोटाळा: मेहूल चोक्सीच्या ठाण्यातील मालमत्तेचे ‘ईडी’कडून मूल्यांकन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:54 IST

मेहूल चोक्सीच्या ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या ठाण्यातील एका मॉलमधील ‘जिली’च्या दोन दुकानांमधील दागिन्यांचे मूल्यांकन सोमवारी दिवसभर सुरू होते. सुमारे आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या दोन दुकानांचा समावेशईडीसह पीएनबी बँकेच्या अधिका-यांची उपस्थितीआठ ते दहा कोटींचे दागिने जप्त

ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा करून पसार झालेल्या नीरव मोदीचा भागीदार तथा त्याचा मामा मेहूल चोक्सी याच्या मालकीच्या ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या ठाण्यातील एका मॉलमधील ‘जिली’च्या दोन दुकानांमधील दागिन्यांचे मूल्यांकन सोमवारी दिवसभर सुरू होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिका-यांसह पंजाब नॅशनल बँकेतील अधिका-यांच्या उपस्थितीमध्ये मूल्यांकनाचे हे काम सुरू होते. या दोन्ही दुकानांमध्ये सुमारे आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘पीएनबी’ बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ठाण्याच्या ‘विवियाना’ मॉलमधील चोक्सी यांच्या मालकीच्या ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काऊंटरवर ईडीच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी छापा टाकून ही दोन्ही दुकाने सीलबंद केली. सोमवारी (१९ फेब्रुवारी रोजी) या दुकानांपैकी शॉपर्स स्टॉपमधील जिलीच्या काउंटर्समधील सर्व दागिन्यांचे मूल्यांकन करणारे तज्ज्ञ, धनंजय सिंग आणि नरेश घई या पंचांच्या आणि दुकानातील कर्मचा-यांच्या मदतीने सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ही पडताळणी सुरू होती. याठिकाणी सुमारे तीन कोटींच्या आसपास हि-यांचे दागिने मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीबाबतचा तपशील तसेच नेमके किती दागिने ताब्यात घेण्यात आले, याची कोणतीही माहिती देण्यास ईडीच्या अधिका-यांनी इन्कार केला. वेगवेगळ्या ३६ पॅकेट्समध्ये ते जप्त केल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.या पडताळणीनंतर याच मॉलमधील ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्याच ‘जिली’च्या दुकानातही दुपारी ३ ते रात्री उशिरापर्यंत मूल्यांकनाचे काम सुरू होते. सायंकाळी ७ पर्यंत तीन कोटींच्या दागिन्यांची मोजणी पूर्ण झाली होती. त्यानंतरचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. दोन्ही दुकानांमध्ये किमान आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.ईडीला संपूर्ण सहकार्य - शॉपर्स स्टॉपगीतांजली समूहाकडून जिली, नक्षत्र, निर्वना अशा वेगवेगळ्या ब्रॅण्डचे दागिने शॉपर्स स्टॉप या काउंटर्सवरून विकले जातात. ईडीने ठाण्यातील गीतांजलीच्या शॉपर्स स्टॉपमधील गिलीच्या काउंटरवर छापा मारल्याने ते चर्चेत आले असले, तरी ईडीला आमचे संपूर्ण सहकार्य असून ग्राहकांसाठी याठिकाणची सर्व काउंटर्स नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याची माहिती शॉपर्स स्टॉपच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrimeगुन्हा