पिस्तूल बाळगणाऱ्यास भिवंडीत पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:41 IST2018-03-31T02:41:00+5:302018-03-31T02:41:00+5:30
पिस्तूल बाळगणाऱ्यास भिवंडीत पकडले

पिस्तूल बाळगणाऱ्यास भिवंडीत पकडले
भिवंडी : शहरात वाडा रोडवरील मेट्रो हॉटेलजवळ पिस्टल विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी गुरुवारी पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ तीन पिस्टल आणि १३ काडतुसे सापडली. त्याला २ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याने पिस्टल खरेदीसाठी ग्राहक मिळतील, या हेतूने शहरात आलेल्या नेतराजसिंग कासेसिंग जाधव (३१) यास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पकडले. नेतराजसिंग हा स्वत: पिस्टल बनवत असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील आहे. सध्या तो शहापूर तालुक्यातील आसनगावच्या दिघेनगरमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहतो.