शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक स्पर्धेतून फास्ट फूडमध्ये ठेवले पिस्तूल, मीरा-भाईंदर गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:43 IST

Mira-Bhyander Crime News: काशिमीरामध्ये हॉटेल-फास्ट फूडसाठी लागणाऱ्या काउंटरपासून फर्निचर आदींच्या व्यवसायातील रोषातून तीन व्यावसायिकांकडे शस्त्रे ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्या दोघांना मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेड्या ठोकल्या.

 मीरा रोड - काशिमीरामध्ये हॉटेल-फास्ट फूडसाठी लागणाऱ्या काउंटरपासून फर्निचर आदींच्या व्यवसायातील रोषातून तीन व्यावसायिकांकडे शस्त्रे ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्या दोघांना मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईत दोन पिस्तुले, तर आरोपींकडून २ पिस्तुले व जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केले. ही पिस्तुले प्रतिस्पर्धी व्यावसायिकांच्या सामानात ठेवून त्यांनासुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मीरा गावठाण महाविष्णू मंदिरशेजारी बिंदा फास्ट फूड आहे. या फास्टफूड चालकांनी भाईंदर पूर्व उड्डाणपुलाजवळ मुन्ना ऊर्फ अनिस खान या व्यावसायिकाकडून फूड काउंटर शुक्रवारी रात्री खरेदी केले होते. त्यातील कप्प्यात शस्त्रे सापडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळेंसह उपनिरीक्षक शिवाजी खाडे व अन्य अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून  दीड लाख रुपये किमतीची मेड इन यूएसए लिहिलेली पिस्तूले, ८० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ४३ जिवंत काडतुसांचे राउंड असा २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला. शनिवारी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार शस्त्र सापडल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर गुन्हे शाखा-१ चे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी मुन्ना यांच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी तपास चालवला असता मुन्नासह अन्य दोघा व्यावसायिकांना शस्त्रांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी व्यावसायिक प्रतिस्पर्धी फिरोज याने हा कट रचला होता, असे समोर आले. पोलिसांनी फिरोज व शाकीर या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत. शाकीर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर