शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीने मुख्य लेखापरीक्षकांचे छाटले पंख; ठोक मानधनावरील लेखाधिका-यांच्या मुदतवाढीस स्थायीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:00 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती. त्यांची मुदत ४ जानेवारीला संपुष्टात आली असून, मुख्य लेखापरीक्षकांच्या निर्देशामुळे प्रत्येक फायलींवर आक्षेपार्ह शेरा मारला जात असल्याने त्या लेखाधिकाऱ्यांना स्थायीने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने पालिकेत मुख्य लेखापरीक्षकांचेच पंख छाटल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.पालिकेत टक्केवारीचा गोरखधंदा नवीन नाही. टक्केवारीतून विकासकामांचा सपाटा लावला जात असला तरी त्या कामांचे प्रस्ताव व देयकांच्या फायली लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. हा कारभार सुसह्य करण्यासाठी प्रशासनाने मुख्य लेखापरीक्षकांना दोन वरिष्ठ लिपिक दिमतीला दिले. त्यानंतरही फायलींच्या कारभाराचा निपटारा होत नसल्याने प्रशासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी ठोक मानधनावर मधुकर सुर्वे यांची लेखाधिकारी तर प्रभाकर वर्तक यांची सहाय्यक लेखाधिकारी पदावर नियुक्ती केली. त्यामुळे आर्थिक प्रस्तावांसह देयकांच्या फायलींचा निपटारा त्वरित होण्याची आस पालिकेतील विभाग प्रमुखांसह कंत्राटदारांना लागून राहिली. परंतु त्या प्रस्तावांसह देयकांच्या फायलींवर मुख्य लेखापरीक्षकांच्या निर्देशानुसार कडक शब्दांत शेरा मारला जाऊ लागल्याने प्रत्येक प्रस्तावासह फायलींवर विभागप्रमुखांसह अधिकाऱ्यांना मुख्य लेखापरीक्षकांचा उंबरठा झिजविण्यास भाग पाडले जाऊ लागले. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली.टक्केवारीचा कारभार सुरू असतानाही मुख्यलेखापरीक्षकांचा हा आडमुठेपणा कारभार का सुरू आहे, अशी चर्चा कंत्राटदारामध्ये सुरू झाली. अखेर त्याची झळ राजकारण्यांना बसू लागली. त्यातच त्या ठोक मानधनावरील लेखाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायीत सादर करण्यात आला. अखेर स्थायीने प्रस्ताव व फायलींवरील सततच्या शेरेबाजीचा वचपा काढण्यासाठी त्या दोन लेखापरीक्षकांच्या मुदतवाढीलाच नकार दिला. यामुळे स्थायीने मुख्यलेखापरीक्षकांचे पंखच छाटल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली असली तरी हे लेखाधिकारी मुदत संपुष्टात येऊनही मुख्यलेखापरिक्षकांच्या वरदहस्तामुळे अद्याप कार्यरत असल्याने राजकीय वर्तूळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक