शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उतरुन लोकांना दगड मारले नाही, म्हणजे बरं, विखे पाटलांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:19 IST

काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. कच्च्या तेलाच्या किमंती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

ठाणे : भाजपचे तत्वज्ञान किंवा कार्यपध्दती ही देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळेच राज्यात किमान समान कार्यक्रमाअंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. भाजपला ज्या ज्या पातळीवरुन दूर ठेवायचे असेल त्यानुसार ते, ते निर्णय घेतले जातील, असा विश्वास महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सबुरीचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.           काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. कच्च्या तेलाच्या किमंती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्देवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, काँग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधन वाढ झाली तर भाजपकडून आंदोलन केले जाते होते. मात्र, आता ते लपुन बसले आहेत का? त्यांचा शोध घेण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच, केंद्राने दर कमी करावेत असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारची जबबादारी यात कमी आहे, राज्य सरकारची अडचण झाली असून 50 हजार कोटींचा जीएसटी अद्यापही केंद्राने दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी, सीआयडी या यंत्रणा पूर्वी माहित नव्हत्या, आता लहान मुलांनासुद्धा ईडी समजायला लागली आहे, या यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरील असून विघातक प्रकृवत्तींना आळा बसविण्यासाठी असाव्यात. मात्र, त्या आता राजकारणासाठी वापरल्या जात असल्याने त्याचे दुष्परीणाम हे निश्चितच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांचा समाचार घेतांना भाजपमध्ये शांत झोप लागत असल्याचे ते सांगत आहे. परंतु तिकडे गेलेल्या लोकांवर किंवा भाजपमधील नेत्यांवर कारवाई होतांना दिसत नाही, असंच होत आहे. परंतु सरकार कसे कमकुवत होईल, कसे पाडता येईल यासाठी केंद्र सरकाराच्या संस्थांनी कितीही प्रयत्न केला तरी आमचे सरकार भक्कपणे राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु अशा नेत्यांची आता किव येत आहे, मोठ्या आशेने त्यांची किव आली आहे, शपथविधीचे स्वप्न पाहत होते, नवीन कपडेही शिवत होते, आज सरकार पडेल, उद्या सरकार पडले असे वाटत होते, परंतु तसे होत नसल्याने त्यांच्यात नैराश्य आलेले आहे. त्यामुळेच् असे बेताल वक्तव्य केले जात असल्याची टिकाही त्यांनी केली. उद्या रस्त्यावर उतरुन लोकांना दगडं मारले नाही, म्हणजे बर असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी कोरोना संपलेला नाही. परंतु तरीदेखील हिवाळी अधिवेशन नागपुरला होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपाthaneठाणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील