VIDEO : पत्रिपुल कबी बनेगा? कल्याणमधील तरुणाचे रॅप साँग व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:13 IST2019-09-13T16:10:33+5:302019-09-13T16:13:38+5:30
कल्याणमधील एका तरुणाने रॅप साँग बनवत शासन प्रशासन ,लोकप्रतिनिधीची निष्क्रियता व नागरिकांच्या असंतोशाला वाचा फोडली आहे.

VIDEO : पत्रिपुल कबी बनेगा? कल्याणमधील तरुणाचे रॅप साँग व्हायरल
कल्याण : नागरिक वाहतूक कोंडीने बेजार झालेले असतानाच पत्रिपुलाचे काम मात्र संथ गतीने सुरू आहे .कल्याणमधील एका तरुणाने रॅप साँग बनवत शासन प्रशासन ,लोकप्रतिनिधीची निष्क्रियता व नागरिकांच्या असंतोशाला वाचा फोडली आहे. युट्युबवर अपलोड केलेलं हे रॅप सॉंग मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे .
धोकादायक असलेला ब्रिटिशकालीन पत्रिपुल तोडल्यानंतर त्या जागी नव्याने पूल उभारण्याचे काम हाती घेन्यात आले .दरम्यान पत्रिपुलाशेजारी असलेल्या दोन पदरी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली असुन यामुळे नागरिकांना गेल्या वर्षभरापासून प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पत्रीपुलबाबत आजपर्यंत अनेक आंदोलन झाली ,या पुलाचे काम पूर्ण व्हावे म्हणून अनेक सामाजिक संघटनांही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामध्ये आता या तरुणांच्या रॅप सॉंगची भर पडली असून या गाण्यातून संबंधित तरुणाने ‘पत्रीपुल कब बनेगा’ असा सवाल उपस्थित केला आहे.
या रॅप साँगच्या माध्यमातून या तरुणाने नागरिकांना होणार त्रास,लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन शासनाची निष्क्रियता, उघड केली असून पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी आपण असाच लढा सुरू ठेवणार असून जो हा पूल पूर्ण करेल त्याला येत्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहनही या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यूट्युबवर अपलोड केलेला हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे .