शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ५८ टक्क्यांवर, कोरोनाची तपासणी करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:14 AM

रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील एक हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल ३२ हजार ४६० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५७ ते ५९ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी १९९ जणांना जीव गमवावा लागला. सध्या या ठिकाणी एक हजार ४३४ रुणांवर उपचार सुरू आहेत. १३ जुलैपर्यंत तब्बल चार हजार ११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात ‘मिशन झीरो’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणीही चाचण्यांचे प्रमाण वाढवून उपचाराचा वेग वाढविण्यात आला आहे. ठाणे शहरामध्ये आतापर्यंत १३,१७९ रुग्ण बाधित असून, यातील ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी पाच हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू असून सात हजार २९३ रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत १३ हजार २४० रुग्ण बाधित झाले. यातील १९८ जणांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी सहा हजार ६३३ रु ग्णांवर उपचार सुरू असून, सहा हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत नऊ हजार ६७८ बाधित झाले. यातील ३०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी तीन हजार ५६९ रु ग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, तर पाच हजार ८०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार ४२५ रुग्ण आढळले. यातील ७१ मृत पावले आहेत. सध्या दोन हजार २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन हजार ३२८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्याचप्रमाणे भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत भिवंडीत दोन हजार ८२४ रु ग्ण बाधित झाले. त्यातील १४७ जणांचा मृत्यू झाला, तर ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ८४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अंबरनाथमध्येही दोन हजार २७५ बाधित रुग्ण असून त्यातील १०५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५९ जणांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दोन हजार १६१ रु ग्ण बरे झाले आहेत.बदलापुरातही आतापर्यंत एकूण एक हजार ४७७ रुग्ण दाखल झाले. या ठिकाणी २० जणांचा मृत्यू झाला आहे. ७४३ रु ग्णांवर उपचार सुरू असून ७१४ रु ग्ण हे आता सुखरूप घरी परतले आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागात सोमवारपर्यंत तीन हजार २१४ रु ग्णसंख्या नोंदविली गेली. यातील ९१ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ८७९ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. एक हजार २४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत.कोरोनाची तपासणी करण्यावर भरजिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण आणि तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. यातून बहुतांश रुग्ण हे प्राथमिक टप्प्यात आढळले. त्यामुळे गंभीर परिस्थिती होण्यापूर्वीच रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आले आहे. सध्या १२ ते १९ जुलै हा लॉकडाऊनचा कालावधी जिल्हाभर वाढविला आहे. यापुढे आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस