उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:30 IST2021-02-19T04:30:42+5:302021-02-19T04:30:42+5:30
टोकावडे : कल्याण - माळशेज घाटरस्त्यावरील करचौडे फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना घडली. ...

उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
टोकावडे : कल्याण - माळशेज घाटरस्त्यावरील करचौडे फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना घडली. खुटल या गावातील मधुकर सावंत हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असता करचौडे फाट्यावर समोरून येणारी दुचाकी व सावंत यांची दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन सावंत गंभीर जखमी झाले. सावंत यांना उपचारासाठी मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र, रुग्णालयातील कर्मचारी जेवायला बसले होते. सावंत यांच्या नातेवाईकांनी आमचा रुग्ण गंभीर जखमी झाला आहे, त्यावर तातडीने उपचार करा अशी विनवणी केली. मात्र, त्याची दखल घेतली नाही. वेळेवर उपचार न झाल्याने सावंत यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली. याबाबत ठाणे येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता वेळीच उपचार केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले.