शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी खेडोपाड्यात रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:12 IST

रुग्णांना डोलीचा आधार : डोंगरदरीचा खडतर प्रवास करून न्यावे लागते रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हारहून अवघ्या २५ ते ३० कि.मी. अंतरावर डोंगर दरीखोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही अद्याप या गावपाड्यांत दळणवळणाची सोय नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याअभावी अबालवृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच आजारी रुग्णाला लाकडाची डोली करून ६ ते ७ किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते, मात्र तेथेही जास्त सुविधा नसल्यामुळे २५ किमीचे अंतर प्रवास करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात यावे लागते. दरम्यान, प्रवासी वाहन वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. यामुळे येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या भागात सर्पदंशमुळे शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. किमान एकदिवसआड जव्हार येथील कुटीर रुग्णालयात सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. यातील काहींवर उपचार होऊन बरे होतात, तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. मागील वर्षी ढवळू रामू गरेल व चांगुणा काकड गरेल यांना सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाले होते, तसेच मृत्यूची नोंद न झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्ष उलटी आहेत, परंतु अजूनपर्यंत दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. दळणवळणाची सुविधा नाही. या आदिवासीपाड्यात नेटवर्क नसल्याने, मुले आॅनलाइन शिक्षण कसे घेणार? रुग्णाला डोली करून खांद्यावर घेऊन डोंगर चढावा लागतो. लोकप्रतिनिधी इकडे फिरकतदेखील नाहीत.- एकनाथ दरोडा,सामाजिक कार्यकर्ता