शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी  

By अजित मांडके | Updated: May 7, 2025 21:28 IST

Thane News: ठाण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसात सायंकाळी सहा च्या सुमारास रूणवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला आहे.

- अजित मांडके  ठाणे - ठाण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसात सायंकाळी सहा च्या सुमारास रूणवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला आहे.

या घटनेत प्रवासी तौफिक सौदागर (२७) याचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक शफीक शब्बीर (५०) हे जखमी झाले आहेत. यामध्ये रिक्षाचालक शफीक याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच प्रवासी तौफिक यालाही गंभीर दुखापत झाल्याने तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता  तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी धाव घेतली. तसेच पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले असून ते दोघे ही राबोडी परिसरात राहणारे आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात