भिवंडीत धोकादायक घराचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:42 IST2021-07-28T04:42:35+5:302021-07-28T04:42:35+5:30

भिवंडी : शहरातील वाणी आळी, झेंडा नाका परिसरात असलेले एक धोकादायक घर मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक ...

Part of a dangerous house in Bhiwandi collapsed | भिवंडीत धोकादायक घराचा भाग कोसळला

भिवंडीत धोकादायक घराचा भाग कोसळला

भिवंडी : शहरातील वाणी आळी, झेंडा नाका परिसरात असलेले एक धोकादायक घर मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक झालेल्या या दुर्घटनेत घरातील ज्येष्ठ नागरिक आणि एका महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

मंगळवारी दुपारी एक वाजता पाऊस सुरू असताना वाणी आळी, झेंडा नाका चौक भागात राहत असलेले मुरलीधर काळे यांच्या घराचा मागील काही भाग अचानक कोसळला. परिसरातील नागरिकांनी महापालिका व अग्निशमन दलाला ही माहिती कळविताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुरलीधर काळे (वय ७५) व सुनीता काळे (५०) यांना सुरक्षित बाहेर काढून धोकादायक इमारतीच्या घराचा भाग काढून टाकला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी भिवंडी महापालिका या दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींत राहणाऱ्या नागरिकांची इतरत्र सोय करणार, की धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची नोटीस बजावून आपले हात झटकणार, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Web Title: Part of a dangerous house in Bhiwandi collapsed