शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

स्थानिक पोलिसांसाठी पार्किंगची सुविधा, मात्र मुंबईत जाणाऱ्या पोलिसांची वाहने रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:25 AM

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील पोलीस ठाण्यांसमोर ‘नो-पार्किंग’च्या ठिकाणी लावलेल्या पोलिसांसह अन्य नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहरातील पोलीस ठाण्यांसमोर ‘नो-पार्किंग’च्या ठिकाणी लावलेल्या पोलिसांसह अन्य नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या आवारात येथील पोलिसांना त्यांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठी जागा आहे. मात्र, शहरातून मुंबई व इतरत्र कामावर जाणाऱ्या पोलिसांना पोलीस ठाण्यात वाहन लावताना अडथळे येतात. त्यामुळे ते ‘नो-पार्किंग’मध्ये वाहने उभी करतात. अनेकदा शहरातील पी १,पी २ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची वाहने टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी उचलून नेल्याचे प्रकराही घडले आहेत.

पोलिसांना कसले नियम ठाण्यासमोर भररस्त्यावर ‘पार्किंग’, अशी म्हणायला चर्चा होत असली तरी गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक पोलिसांनी ‘नो-पार्किंग,’ वाहतुकीला अडथळा ठरतील, अशा अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई सुरू केली आहे. मग ती व्यक्ती भले पोलीस असली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आठवडाभरापासून पी १, पी २चे नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

---------------

शहरात नो पार्किंग कारवाई केलेल्या वाहनांची संख्या

२०१९ - ३,७९१

२०२० - ९,५५०

२०२१ (मेपर्यंत) ४,२३९

या सर्व वाहन चालकांकडून २०० रुपये याप्रमाणे दंड आकारला असून, त्यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

--------------------

शहरातील चारपैकी तीन पोलीस ठाण्यांना पार्किंगची सुविधा

अ) : पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याला पार्किंगची सुविधा नाही. ते पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरच एका कडेला दुचाकी, चार चाकी वाहने उभी करतात.

ब) रामनगर पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्यापैकी दुचाकी वाहने उभी करायला जागा आहे.

क) मानपाडा पोलीस ठाण्यातही दुचाकी पार्किंगसाठी जागा आहे, तेथे तक्रारदार दुचाकीवर आल्यास त्यांना वाहन पार्क करता येते.

ड) टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पुरेशी जागा उपलब्ध आहे.

------------------

पोलीस चौक्यांना मात्र पार्किंगची सुविधा नाही

बीट मार्शल किंवा गस्तीवरील पोलिसांना ऑनड्युटी असताना प्रत्येक वेळी पोलीस ठाण्यात यायला लागू नये, तसेच ठिकठिकाणच्या नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, यासाठी शहरात पूर्वेला तीन ते चार ठिकाणी पोलीस चौक्या आहेत. मात्र, तेथे पोलिसांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी सुविधा नसल्याने ते त्यांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या करतात. पूर्वेला ठाकुर्ली, शिवाजी उद्योगनगर, पेंडसेनगर, शेलार नाका, पेंढरकर महाविद्यालय आदी चौक्यांच्या ठिकाणी पोलिसांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे.

-----------------

कोविडमुळे गेले वर्षभर टोईंगची कारवाई जवळपास बंदच होती. मागील आठवड्यापासून पुन्हा कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक नियमात जे अडथळे येतात, कोंडी करतात, अशा सर्व वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. मग संबंधित शासकीय, निमशासकीय कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, अशा सबबी ऐकल्या जात नाहीत. सूचना देऊन नियम तोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई निश्चितच केली जाते.

- उमेश गित्ते, वरिष्ठ वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक, डोंबिवली.

-----------------

फोटो आहे.