ठाण्यात कारला आग लागल्याने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 21:45 IST2020-12-11T21:45:21+5:302020-12-11T21:45:37+5:30

आग लागल्याने त्या मार्गिकेवरील वाहनांची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.

Panic over car fire in Thane | ठाण्यात कारला आग लागल्याने घबराट

ठाण्यात कारला आग लागल्याने घबराट

ठाणे: ईस्टर्न एक्सप्रेसवरील ठाणे, नितिन कंपनी उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री एका मोटार कारला  अचानक आग लागल्याची घटना रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागल्याने त्या मार्गिकेवरील वाहनांची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत गाडीला लागलेली आग विझवली.या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Panic over car fire in Thane