लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावरील नितिन कंपनी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला शुक्र वारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटार कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी यात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.नितीन कंपनीजवळील उड्डाणपूलाजवळ एका मोटारकारला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यववस्थापन विभाग तसेच पाचपाखाडी येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी धाव घेतली. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. साधारण ८ वाजून ५० मिनिटांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, या कारला आग लागल्यानंतर कार चालकाने भीतीमुळे तिथून पलायन केले. त्यामुळे या कारचे मालक आणि चालकाचे नाव समजू शकले नसल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात चालत्या कारला आग लागल्याने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 21:43 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावरील नितिन कंपनी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला शुक्र वारी रात्री ८.३० वाजण्याच्या ...
ठाण्यात चालत्या कारला आग लागल्याने घबराट
ठळक मुद्दे अग्निशमन दलाने मिळविलेआगीवर नियंत्रण चालकाचे भीतीने पलायन