पालघरात १५ इमारतींना धोका

By Admin | Updated: May 8, 2017 05:52 IST2017-05-08T05:52:52+5:302017-05-08T05:52:52+5:30

नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत

In Palghar, 15 buildings are at risk | पालघरात १५ इमारतींना धोका

पालघरात १५ इमारतींना धोका

हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत कोसळल्यास जीवित व वित्तहानीला मालकांना जबाबदार धरण्यात आले आहे.
पालघर नगर परिषदेने पावसाळा तोंडावर आल्याने तुफानी पाऊस, पूर, वादळात कोसळू शकतील अशा धोकादायक ठरविलेल्या १५ इमारतीत रफीक लुलानिया - सरकारी दवाखान्या जवळ, दामू पाटील चाळ-विमल जगमोहन दामनिया, पंचायत समिती जवळ, झटकल व्हिला, मशिदीच्या पाठीमागे, शांतीलाल जैन चाळ, सरकारी दवाखान्या जवळ, मोडकी चाळ, जय जलारांम टी हाऊस, स्टेशन जवळ, नॅशनल ज्वेलर्स/सागरमल जैन इमारत स्टेशन जवळ, नाकोडा कलेक्शन/रामचंद्र तोरानी,स्टेशन जवळ, शकुंतला शाम कुमार मिश्रा,देविशा चाळ, वजली पाडा, विजय फरसाण मार्ट, स्टेशन जवळ, डॉ.एस पी जैन व श्याम अवसरमोल, यांची इमारत स्टेशन जवळ, बिस्मिल्लाह कॅटरर्स/अल्लाउद्दीन खान यांची इमारत कचेरी रोड, शांतीलाल जैन यांची इमारत राज टॉकिज जवळ, विजय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, कमला पार्क, माहीम रोड, पोषण्णा भुमण्णा संकटोल्लू यांची इमारत, पालघर, प्रवीण हरिश्चंद्र भानू यांची इमारत, टेम्भोडे इ. चा समावेश आहे. मागील ५-७ वर्षा पासून नगरपरिषदे कडून १२ इमारतींना नोटिसी बजावण्यात यायच्या मात्र या वर्षी त्यात ३ इमारतींची भर पडली आहे. प्रत्येक वर्षी नगर परिषद या इमारतीच्या मालकांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचयाती व औद्योगिक अधिनियमानुसार या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या मालक, भोगवटाधारक व वाणिज्य वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र आजपर्यंत त्या आहे तशाच आहेत.
पालघर नगर परिषदेला लागूनच असलेल्या धोकादायक इमारतीला मागील अनेक वर्षापासून नोटीस बजावली जात असून या इमारती शेजारी एसटी स्टॅन्ड, भाजी मार्केट,उपविभागीय पोलीस अधिकारी याचे कार्यलय असल्याने सकाळ-संध्याकाळ नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास मोठ्या जीवितहानीच्या घटनेला सामोरे जाण्याची आपत्ती ओढवू शकते.

दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

नोटीस बजावण्यामागे त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. ती होत नसेल तर नगरपालिकेने अशी धोकायदायक इमारत पाडून टाकणे अपेक्षित आहे. जर त्यातील नागरिक अन्यत्र स्थलांतरीत होण्यास तयार नसतील तर त्यांना पोलीसी बलाचा वापर करून अन्यत्र देऊन इमारती खाली करून त्या पाडून टाकणे देखील अपेक्षित आहे. परंतु यातील काहीही घडून येत नाही त्यामुळेच नगरपालिका प्रशासन नोटीस बजावून आपली जबाबदारी पूर्ण करीत असली तरी त्यामुळे भविष्यातील दुर्घटना काही टळणार नाही. पालिका फक्त आम्ही नोटीस बजावली होती असे सांगून जबाबदारी झटकू शकते एवढेच.

Web Title: In Palghar, 15 buildings are at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.