शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

सोने चोरी प्रकरणातील मालक अडचणीत , दागिने साडेआठ किलोे : विमा भरपाई त्रासाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:30 AM

दुकानातील सोने लॉकरमधून चोरीला गेले तरच विम्याची भरपाई मागता येते, असा नियम असल्याने अंबरनाथला शोकेसमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर पडलेल्या दरोड्यातील दुकानमालक अडचणीत आल्याची

अंबरनाथ : दुकानातील सोने लॉकरमधून चोरीला गेले तरच विम्याची भरपाई मागता येते, असा नियम असल्याने अंबरनाथला शोकेसमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर पडलेल्या दरोड्यातील दुकानमालक अडचणीत आल्याची चर्चा आहे. या दरोड्याबाबत विमा कंपनी काय भूमिका घेते त्याकडे ज्वेलर्सचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दरोड्यात लुटले गेलेले सोने साडेआठ किलो असल्याचे प्रत्यक्ष मोजणीनंतर निष्पन्न झाले.अंबरनाथच्या सागर ज्वेलर्स या दुकानातून रविवारी दुपारी ८.५ किलो सोने चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या दाराने प्रवेश केला आणि शोकेसमध्ये लावून ठेवलेले दागिने चोरले. ८ किलो ३०० ग्राम सोने आणि दोन लाखांचे चांदीचे बिस्कीट चोरीला गेले आहे. दिवसा जेवणाच्या वेळेत ही चोरी झाल्याने सर्व दागिने शोकेसमध्ये तसेच होते. ते लॉकरमध्ये ठेवलेले नव्हते. त्यामुळे मालक महेंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुकानातील सोन्याचा विमा असूनही त्यांना त्याचा कितपत फायदा मिळतो, याकडे सराफांचे लक्ष आहे. ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याचा विमा काढतांना काही ठळक बाबी निश्चित केलेल्या असतात. त्यात महत्वाचे म्हणजे रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानातील लॉकरमध्ये सर्व सोने ठेवणे गरजेचे असते. लॉकर तोडून सोने लुटल्यासच विम्याची भरपाई मिळते. कारण दुकानातील लॉकर आणि त्यांची सुरक्षा पाहूनच कंपनी सोन्याला विम्याचे संरक्षण देते. दुकानावर दरोडा पडला, तरी भरपाई मिळते. पण सागर ज्वेलर्समध्ये शोकेसमध्ये ठेवलेले दागिने चोरल्याचा प्रकार घडला आहे.चोरटा कॅमेºयात कैद-चोरट्यांपैकी एका चोरट्यानेच दुकानात प्रवेश केला. इतर त्याचे साथीदार हे दुकानाबाहेर पहारा देत होते. दुकानात शिरलेल्या चोरट्याने सुरुवातीला तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे त्याची ओळख पटणे शक्य नव्हते. पण याच चोरट्याने सोने चोरल्यावर दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर बंद करण्याचा प्रयत्न केला.डीव्हीआरऐेवजी चोरट्याने घाईत संगणकाचा प्लग काढला. सीसीटीव्ही बंद झाले असले असे समजून त्याने तोंडावरील मास्क काढून टाकला. त्यामुळे त्याचा चेहरा कॅमेºयात कैद झाला.दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी जैन यांना मोबाईलमधूनही करता येत होती. पण जैन यांनी आपले दोन्ही मोबाईल दुकानातच चार्जिंगसाठी ठेवले होते. ते मोबाईलही चोरट्यांनी लंपास केले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे