शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

"इतर पक्षांनी समाजाचे देणे लागतो या बांधिलकीतून समाजहिताचे काम करावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:26 IST

उल्हासनगर महापालिकेला शिवसेनेकडून ९ रुग्णवाहिका

उल्हासनगर : ऐन कोरोना महामारीत रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या वतीने ८ रुग्णवाहिका व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून १ कार्डिअल रुग्णवाहिका उल्हासनगर महानगरपालिकेस शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते देण्यात आली. व्ही टी सी मैदानात मंगळवारी दुपारी १ वाजता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. इतर पक्षांनी समाजाचे देणे लागतो. या बांधिलकीतून समाजहिताचे काम करावे अशी अप्रत्यक्ष टीका लांडगे यांनी भाजपासह इतर पक्षावर केली.

 उल्हासनगरात मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सामान्य नागरिकांना रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले होते. तसेच रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा बिले आकारात असल्याने नागरिकात असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर महापालिकेने रुग्णवाहिकासह शालेय बसेस कोरोना रुग्णाला आणण्यासाठी भड्यातत्वार नेमल्या. रुग्णवाहिका मिळत नसल्याने रूग्णालयात जाण्या पूर्वीच रुग्ण मृत्यू होत असल्याचे प्रकार उघड झाले होते. अश्या परिस्थितीत शिवसेना महापालिकेच्या मदतीला धावली. कोरोना रुग्णासाठी ८ रुग्णवाहिका व खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कार्डीअल रुग्णवाहिका महापालिकेला देण्यात आली. मात्र गेल्या एका महिन्या पासून रुग्णवाहिका महापालिका प्रभाग समिती कार्यालय प्रांगणात पडून होत्या.

महापालिका प्रभाग समिती क्रं-३ येथील व्हि टी सी ग्राउंड मध्ये मंगळवारी दुपारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून रुग्णवाहिकेची चाबी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिली. यावेळी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह महापालिका परिवहन विभागाचे प्रमुख यशवंत सगळे आदी जन उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना