शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा आदेश कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:20 AM

राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन ४८ महिने उलटले तरी अजून हे आदेश कागदावरच आहेत.

- नारायण जाधवठाणे  - राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचाºयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन ४८ महिने उलटले तरी अजून हे आदेश कागदावरच आहेत.अनेक ठिकाणी महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याचे वास्तव महाराष्ट्र शासनाने २०१४ साली जाहीर केलेल्या महिला धोरणातून उघड झाले. त्यानंतर, १९ जुलै २०१४ रोजी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, ज्या कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नसेल, त्यांनी येत्या ४८ तासांत तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची शेड टाकून ते उभारावे तसेच भाडेतत्त्वावरील शासकीय कार्यालयात अशी सोय नसेल, तर त्यांनी मोबाइल टॉयलेटची सोय करावी. यापुढे महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यास संबंधित आस्थापना, कारखानामालकांवर खटले दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, हे आदेश निघून ४८ महिने उलटले तरी आजही राज्यातील शहरी भागातील अनेक शासकीय आणि खासगी आस्थापना, कारखाने येथे स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे दुर्गम, ग्रामीण व आदिवासी परिसरातील दगडखाणी, वीटभट्टींवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली गेली असतील, अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे.देशभरात गुरुवारचा आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे हे आदेश आजही कागदावरच आहेत.काय होते ते शासन आदेशशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहाची सोय नसेल, तर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून तातडीने स्वच्छतागृहाची सोय करावी़सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम पूर्ण होईपर्यंत तातडीची सोय म्हणून पत्र्याची शेड उभारून स्वच्छतागृह उभारावे़शासनाची इमारत भाड्याने असेल अन् त्यात स्वच्छतागृह नसेल, तर मोबाइल टॉयलेटची सोय करावी़ शासकीय आणि खासगी आस्थापनांनी यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे संपर्क साधावा़यापुढे कारखाने, आस्थापनांची तपासणी करताना खास महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे किंवा नाही, याची संबंधितांनी तपासणी करावी, तसा अभिप्राय नोंदवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये.यानुसार, कामगार विभागाच्या अधिपत्त्याखालील सर्व कार्यालयप्रमुखांनी प्राधान्यक्रमाने सर्व कार्यालयांत येत्या तीन महिन्यांत महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय केली नाही, तर संबंधितांना जबाबदार धरण्यात येणार आहे़शासन दररोज जनहितार्थ किंवा स्वशिस्तीसाठी अनेक आदेश, अध्यादेश काढते. मात्र, त्याची अंमलबजावणी होते का, हे पाहत नाही. एखादा निर्णय घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या सचिव किंवा अन्य अधिकाºयांनी आदेशाची कितपत अंमलबजावणी झाली, त्यांचे काम कुठपर्यंत आले, याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल लोकप्रतिनिधींसमोर ठेवायला हवा. सचिव किंवा अन्य अधिकारी बजेट नाही, कर्मचारी नाहीत, असे कागदी घोडे नाचवतात. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे, ही अत्यावश्यक आणि सामाजिकदृष्ट्या गंभीर बाब आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी व्हायलाच हवी. या विषयावर याच अधिवेशन काळात कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याशी चर्चा करून या आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही, याचा जाब विचारून कार्यवाहीसाठी प्रयत्न केला जाईल.- डॉ. नीलम गोºहे, आमदार, शिवसेना

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान