ठाण्यातील ३५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:40 IST2020-11-06T23:37:01+5:302020-11-06T23:40:23+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल ३५ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी गुरुवारी काढले आहेत. खंडणी विरोधी पथकासह गुन्हे शाखेतील अनेक अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले आहे. कल्याण गुन्हे शाखेचे संजू जॉन यांची ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकामध्ये वर्णी लागली आहे.

खंडणी विरोधी पथकासह गुन्हे शाखेत फेरबदल
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल ३५ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी गुरुवारी काढले आहेत. आठ अधिकाºयांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संधी देण्यात आली असून खंडणी विरोधी पथकासह गुन्हे अन्वेषण विभागातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
या बदल्यांमध्ये पाच अधिकाºयांना विशेष शाखेसारख्या साईड ब्रॅन्चला जावे लागले आहे. विशेष शाखेच्या सुलभा पाटील यांना डायघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून संधी मिळाली. तर कल्याण नियंत्रण कक्षातील विलास पाटील यांची भिवंडी गुन्हे शाखेमध्ये, मानवी संसाधन विभागाचे गणपत पिंगळे यांची कोनगावच्या वरिष्ठ निरीक्षकपदी बदली झाली. निजामपुराचे शंकर इंदलकर यांना भोईवाडा, कोपरीचे दत्ता गावडे बदलापूर पश्चिम, कोनगावचे संजय साबळे यांची विष्णुनगर, शांतीनगरचे सचिन सांडभोर यांची डोंबिवली, कळवा येथील कन्हैयालाल थोरात यांची विठ्ठलवाडी तर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे विकास घोडके यांची गुन्हे शाखा वागळे इस्टेटच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. इंदलकर, गावडे, साबळे, सांडभोर, थोरात आणि घोडके यांना थेट वरिष्ठ निरीक्षक म्हणून संधी मिळाली आहे. यातील थोरात यांनी मधुकर कड यांच्या अनुपस्थितीमध्ये मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी सांभाळली होती. खंडणी विरोधी पथकाचे संजय शिंदे यांची अमंली पदार्थ विरोधी पथकात तर मध्यवर्ती शोध पथकाचे अशोक होनमाने यांना भिवंडीच्या गुन्हे शाखेमध्ये वरिष्ठ निरीक्षकपदी बदली झाली. वाहतूक शाखेमधून तात्पूरत्या स्वरुपात आलेले दत्तात्रय ढोले यांना आता वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कायम केले आहे. डायघरचे चंद्रकात जाधव यांना मात्र विशेष शाखेमध्ये जावे लागले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे अरुण क्षीरसागर यांनाही वागळे इस्टेट गुन्हे शाखेमध्ये संधी मिळाली आहे. तर शांतीनगरच्या वरिष्ठ निरीक्षक ममता डिसोझा यांची कोपरी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
.............................................
खंडणी विरोधी पथकात फेरबदल
* खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची मानवी संसाधन विभागात तर कल्याण गुन्हे शाखेचे संजू जॉन यांची कोथमिरे यांच्या जागी खंडणी विरोधी पथकात नियुक्ती झाली आहे. भिवंडी गुन्हे शाखेचे शितल राऊत यांची शांतीनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या रामचंद्र वळतकर यांची राबोडी तर गुलफरोज मुजावर यांची डायघर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटचे जयराम रणवरे यांची कासारवडवली, चितळसरच्या प्रियतमा मुठे- वागळे इस्टेट, राबोडीचे सुधाकर हुंबे यांची खंडणी विरोधी पथकात तर नौपाडा पोलीस ठाण्याचे अविनाश सोडकर यांची कोपरी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. विष्णुनगरचे राजेंद्र मुणगेकर यांची विशेष शाखेत, राबोडीचे दिलीप रासम यांची कळवा, नारपोलीचे पंढरीनाथ भालेराव यांची राबोडी पोलीस ठाण्यात बदली झाली असून कोळसेवाडीचे मधुकर भोंगे यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली. कासारवडवलीच्या प्रदीप उगले यांना मात्र आता ठाणे नियंत्रण कक्षात जावे लागले आहे. तर डोंबिवलीच्या नारायण जाधव यांची टिळकनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. या बदल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने झाल्याचे सह आयुक्त मेकला यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.