शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मताधिक्यात विचारेंची मोदी-गांधींशी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:10 AM

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक : महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार राजन विचारे यांनी तब्बल चार लाख १२ हजार १५१ एवढे विक्रमी मताधिक्य प्राप्त केल्याने देशात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुमान विचारे यांनी प्राप्त केला आहे. अर्थात गुजरात, हरियाणा तसेच राजस्थानच्या काही उमेदवारांनी सहा ते साडेसहा लाखांच्यापेक्षा जास्त मताधिक्य प्राप्त केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मतदारसंघातून पाच लाख ५७ हजार १४ एवढे मताधिक्य प्राप्त झाले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून चार लाख ७९ हजार ५४५ एवढे मताधिक्य प्राप्त झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजयी होताना चार लाख ३१ हजार ८७० असे मताधिक्य मिळाले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना चार लाख ५७ हजार एवढे मताधिक्य प्राप्त झाले. त्यामुळे विचारे हे देशात मोठे मताधिक्य प्राप्त करणाºया उमेदवारांच्या यादीत गेल्याची चर्चा ठाण्यातील वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सुरू झाली आहे. अर्थात, मोदींचे मताधिक्य विचारे यांच्यापेक्षा जास्त असतानाही त्या संदेशात त्यांना सहाव्या स्थानी दाखवले आहे. प्रत्यक्षात विचारे हे मोदींपेक्षा मताधिक्यात खाली आहेत.

तसेच देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळणाºया पाच खासदारांत भाजपच्याच उमेदवारांचा समावेश आहे. यात गुजरातच्या नवसारीचे खासदार सी.आर. पाटील यांना ६ लाख ७८ हजार ४४५ मताधिक्य मिळाले असून त्या खालोखाल हरियानाच्या कर्नालमधून संजय भाटिया यांना ६ लाख ५४ हजार२६९ तर राजस्थानच्या भिलवाडामधून सुभाषचंद्र बहोरिया यांनी ६ लाख ३७ हजार ९२० तर उत्तर प्रदेशातील फरिदाबादमधील कृष्ण पाल यांनी ६ लाख ३६ हजार ०३२ इतके प्रचंड मताधिक्य मिळविले आहे. म्हणजे विचारे यांचा नंबर देशात तुलनेनी खाली असला तरी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणाऱ्यांमध्ये गोपाळ शेट्टी हे पहिल्या स्थानावर असतील, तर दुसºया स्थानावर राजन विचारे आहेत. तिसºया स्थानावर जळगावचे उन्मेष पाटील असून त्यांना चार लाख ११ हजार ६१७ एवढे मताधिक्य प्राप्त झाले आहे. विचारे यांच्या उमेदवारीला भाजपमधून अगोदर झालेला विरोध पाहता विचारे हे इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, अशी शक्यता कुणालाही वाटली नव्हती. भाजप, शिवसेनेचे नेते व कार्यकर्तेही या मताधिक्याने अचंबित झाले आहेत. ठाण्यातील मतदारांनी मोदींना विजयी करण्याकरिता विचारे यांच्या पारड्यात मते टाकल्याचा दावा भाजपचे नेते खासगीत करत आहेत, तर शिवसैनिक हे शिवसेनेच्या संघटन कौशल्याचे यश असल्याचे सांगत आहेत.कल्याणला ठाण्याने मागे टाकलेकल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत होते. त्यांच्यासमोरील बाबाजी पाटील हे उमेदवार कमकुवत असल्याने डॉ. शिंदे यांचे मताधिक्य ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक असेल, अशी चर्चा पहिल्यापासून सुरू होती. खुद्द शिंदे यांनीही आपल्याला यावेळी मताधिक्याचे रेकॉर्ड करायचे आहे, असे पत्रकारांना सांगितले होते. मात्र, शिंदे हे तीन लाख ४४ हजार ३४३ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. शिंदे यांच्यापेक्षा ठाण्यातील विचारे यांना अधिक मताधिक्य लाभल्याने कल्याणवर ठाण्यातील मतदारांनी मात केली, अशी चर्चा आहे.