शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखतो तोच खरा आदर्श शिक्षक : संपदा जोगळेकर-कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:43 IST

आपल्या यशाचं श्रेय शिक्षकांनाच आहे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देआपल्या यशाचं श्रेय शिक्षकांनाच आहे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचं वक्तव्य.

ठाणे: "मला घडविण्यासाठी जोशी - बेडेकर महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी अतोनात मेहनत घेतली. मी नृत्य, अभिनय , निवेदन , लेखन  आणि दिग्दर्शन क्षेत्रात काम करू शकले. याचे श्रेय माझ्या शिक्षकांना आहे. माझ्यातील कौशल्य ओळखून त्यांनी मला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखतो तोच खरा आदर्श शिक्षक असतो," असे उद्गार अभिनेत्री आणि लेखिका संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांनी काढले. विद्या प्रसारक मंडळ संचालित जोशी बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या IQAC समितीने दिनांक ९ जून २०२१ ते दिनांक १३ जून २०२१ या दरम्यान कौशल्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा ९ जून २०२१ रोजी झूम मीटिंग या आभासी व्यासपीठावर पार पडला. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना संपदा जोगळेकर- कुलकर्णी बोलत होत्या. या कौशल्य कार्यशाळेत घरबसल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ,पालकांना त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी व नवीन कला व व्यवहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी तब्बल अकरा विविध कला कौशल्यांचा या कार्यशाळेत समावेश करण्यात आला आहे. यात रांगोळी, वारली पेंटिंग, केक मेकिंग इ. बरोबरच डिजिटल कम्युनिकेशन ,बेसिक बँकिंग,  क्रिप्टोकरन्सी इ .अशा व्यवहारिक कौशल्यांचा सुद्धा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला IQAC  समितीच्या समन्वयक डॉ.प्रज्ञा राजबहादुर यांनी प्रेक्षकांशी या कार्यशाळेत बद्दल संवाद साधला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "कलेचे आपल्या आयुष्यातील स्थान व आयुष्य जगण्यासाठी कलेचे महत्त्व काय असते हे स्वअनुभवांचे किस्से सांगून विषद केले," असं संपदा जोगळेकर-कुलकर्णी म्हणाल्या.  

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाTeacherशिक्षकSampada Joglekarसंपदा जोगळेकर