जिल्ह्यात झाले केवळ १७ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST2021-06-02T04:29:50+5:302021-06-02T04:29:50+5:30
ठाणे : जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार नागरिकांपैकी केवळ १५ लाख ९३ ...

जिल्ह्यात झाले केवळ १७ टक्के लसीकरण
ठाणे : जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार नागरिकांपैकी केवळ १५ लाख ९३ हजार ४४१ जणांचे लसीकरण झाले. आता रोजच्या रोज लसींचा साठा येत असला तरी पुढील दोन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक आहे, तर २ ते ३ टक्केच डोस वाया जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. आतापर्यंत केवळ १७ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
फ्रन्टलाइन वर्कर
पहिला डोस - ९७,६६२
दुसरा डोस - ४६,२५०
हेल्थ वर्कर
पहिला डोस - ९८,१८७
दुसरा डोस - ५७,१४९
४५ ते ६० वयोगट
पहिला डोस - ५,४७,६७७
दुसरा डोस - ८६,८१९
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस - ४,०९,८९७
दुसरा डोस - १,६६,८१७
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस - ८२,९८३
जिल्ह्यात केवळ १७ टक्के लसीकरण
५००० डोस शिल्लक
जिल्ह्याकडे उपलब्ध लसींचा साठा - (२९ मे रोजीचा हा साठा आला आहे)
कोविशिल्ड - १७,०००
कोव्हॅक्सिन - ९,४४०
आतापर्यंत झालेले लसीकरण - १५ लाख ९३ हजार ४४१
कोविशिल्ड
पहिला डोस - १०,९०,४०७
दुसरा डोस - २,९५,५८७
कोव्हॅक्सिन
पहिला डोस - ९६,५२३
दुसरा डोस - ५८,८७८
३ टक्के डोस वाया
ठाणे जिल्ह्यात आलेल्या लसींच्या साठ्याचे योग्य नियोजन केले जात आहे. एका कुपीतून दहा जणांना लस दिली जाते. कोविशिल्डमध्ये ११ जणांनाही लस देता येऊ शकते. लस वाया जाऊ नये, असा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यानुसार लसींचे योग्य नियोजन केल्याने आतापर्यंत सुमारे तीन टक्के डोस वाया गेले.
..........
वाचली