आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक: दोन तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 21:51 IST2021-02-08T21:49:24+5:302021-02-08T21:51:24+5:30

आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाºया शंकर रामसिंग सोनार (४८, रा. किसननगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्षाच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली.

Online sex racketeer arrested: Two youths released | आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक: दोन तरुणींची सुटका

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाºया शंकर रामसिंग सोनार (४८, रा. किसननगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्षाच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. त्याच्या तावडीतून एका १६ वर्षीय मुलीसह दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
शंकर सोनार हा आॅनलाईन मुलींची माहिती देऊन त्यांना शरीर विक्रयासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कडलग यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कळवा नाका येथे धाड टाकून सोनार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या तावडीतून शरीर विक्रयासाठी आणलेल्या या दोन पिडित तरुणींची सुटका करण्यात आली. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्याखाली कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Web Title: Online sex racketeer arrested: Two youths released