शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यांचे पैसेही भरा आता ऑनलाइन, ठाणे आरटीओचा अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 22:24 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील पारदर्शक कारभार चालण्यासाठी परिवहन प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिकाऊ परवाना प्रणालीपाठोपाठ आता परवान्यांसंबंधित पैसेही भरण्यासाठी सारथी प्रणाली ठाण्यात सोमवारी कार्यान्वित केली आहे.

पंकज रोडेकरठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील पारदर्शक कारभार चालण्यासाठी परिवहन प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिकाऊ परवाना प्रणालीपाठोपाठ आता परवान्यांसंबंधित पैसेही भरण्यासाठी सारथी प्रणाली ठाण्यात सोमवारी कार्यान्वित केली आहे. यामुळे तासन्तास रांगेत उभे राहावे लागणा-यांना आता घरबसल्या 24 तासांत कधीही पैसे भरता येणार आहेत. या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. त्याचबरोबर या संबंधित कामासाठी दिवसा जमा होणा-या रकमेपेक्षा आता दुपटीने रक्कम जमा होऊ लागल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या मर्फी कार्यालयात नोव्हेंबर 2016 मध्ये शिकाऊ परवाना प्रणालीला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सारथी ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार, नवीन परवाना असो वा बनावट परवाना किंवा त्याचे नूतनीकरण असो. तसेच इतर परवान्यांसंबंधित कामांचे पैसे आता ऑनलाइन भरावे लागणार आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे ठाणे आरटीओच्या मर्फी कार्यालयात जाऊन पैसे भरण्यासाठी जरी चार खिडक्या सुरू असल्या तरी, पैसे भरण्यासाठी त्यावर नेहमीच गर्दी पाहण्यास मिळत होती. यामुळे रांगेत तासन्तास उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. अथवा, दलालांना पैसे देऊन ही कामे क रून घ्यावी लागत होती. त्याचबरोबर त्या चार खिडक्यांवर दिवसाला सुमारे दीड लाख रुपये जमा होत होती.परंतु ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सुमारे तीन ते साडेतीन लाख, तर दुस:या दिवशी साधारणत: चार लाख रुपये जमा झाल्याची माहिती आरटीओ सूत्रंनी दिली. या प्रणालीमुळे पैसे भरण्यासाठी खर्च होणारा वेळ आणि होणारे हेलपाटेही कमी होणार आहे. मात्र, हे सव्र्हर धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांसाठी ते त्रासदायक ठरण्याची भीतीही वर्तवली जात आहे. ते जलद चालू राहण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीपासून योग्य ती पावले उचलावी, अशी मागणीही पुढे येऊ लागली आहे. यासंदर्भात दुजोरा देऊन परवान्यांसंबंधित पैसे भरण्यासाठी नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन पैसे भरायचे आहे. तसेच ती पावती डाउनलोड करून अर्जाला जोडायची. या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, त्याचबरोबर दलालांनाही 100 टक्के चाप बसेल. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे