शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

'ऑनलाईन शिक्षण म्हणजे धूळफेक, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची गरज' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 19:15 IST

ऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केलं.

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केलं.

भिवंडी - ऑनलाईन शिक्षण हे सर्वदूर सर्व विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही धूळफेक असल्याचे मत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केले . भिवंडी पोलीस संकुल येथे आयोजित भिवंडी तालुका स्तरीय बैठकी दरम्यान तेे बोलत होते .या बैठकीस आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर एच किल्लेदार ,उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर ,महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया ,तहसीलदार शशिकांत गायकवाड ,पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .          ऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी महसूल ,पुरवठा ,शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य ,महिला व बाल कल्याण ,वन , वीज ,रोजगार हमी योजना या विभागांची झाडाझडती घेत त्यांच्या कडील समस्या जाणून घेतानाच करावयाच्या उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. आज ही पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत तर ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क समस्या असल्याने शासन किती ही म्हणत असलं तरी असंख्य विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत असल्या बद्दल खंत व्यक्त करीत , कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक आहार पोहचविण्याची जबाबदारी असून प्रत्येक कामाच्या ठिकाणी उलट तपासणी झाल्यास आपल्या कामातील उणीव दिसून आल्यास त्याच्या निराकरणा साठी मदत होऊ शकते असे स्पष्ट करीत, पुरवठा विभाग कडून आदिवासी कुटुंबा पर्यंत शासनाच्या मोफत व अल्प दरातील धान्य पोहचविण्याची जबाबदारी असून त्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिले आहे.          या बैठकी दरम्यान प्रलंबित वन हक्के दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर पुढाकार घेण्या बाबत सूचना देत यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे आवाहन केले .या बैठकीस सर्व विभागातील अधिकारी , श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण