तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:49 IST2025-11-05T06:48:50+5:302025-11-05T06:49:14+5:30
प्रकल्प क्रमांक ३ हा अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रकल्प १ ते ४ यामधील प्रकल्प क्रमांक ३ हा अंतर्गत दुरुस्तीसाठी मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद होणार असल्याने २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक अशोक शिंदे यांनी ही माहिती दिली. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील ३ व ४ हे प्रकल्प प्रत्येक दोन वर्षांनी एकदा दुरुस्तीसाठी बंद केले जातात. यावर्षी प्रकल्प ३ ची अंतर्गत दुरुस्ती करण्यात येणार आहे.