डंपरच्या धडकेने एक जण गंभीर जखमी
By सदानंद नाईक | Updated: October 24, 2023 16:55 IST2023-10-24T16:55:06+5:302023-10-24T16:55:49+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३, टॉउन हॉल समोरील रस्ता मुख्य मार्केटकडे जाणारा असल्याने, वाहनांची वर्दळ वाढली आहे.

डंपरच्या धडकेने एक जण गंभीर जखमी
उल्हासनगर : कॅम्प नं-३, टॉउन हॉल समोर, विजय सेल येथे रस्त्याच्या बाजूला उभा असलेले विजय खोरेजा यांना सोमवारी रात्री ८ वाजता भरधाव डंपरने धडक देत फरफटत नेले. यामध्ये खोरेजा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, टॉउन हॉल समोरील रस्ता मुख्य मार्केटकडे जाणारा असल्याने, वाहनांची वर्दळ वाढली आहे. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान विजय खोरेजा हे स्त्याच्या बाजूला उभे होते. यावेळी भरधाव आलेल्या डंपरने खोरेजा यांना जोरदार धडक देऊन फरफटत नेले. या अपघातात त्याच्या खांद्याचे हाड मोडले असून फरफटत नेल्याने त्यांच्या अंगाला जखमा झाल्या आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी या प्रकरणी डंपरसह पळून गेलेल्या डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला. खोरेजा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.